अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) महापालिकेवर आर्थिक ‘शिमगा’ साजरा करण्याची वेळ आली की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्याचं कारण असं आहे, की या महापालिकेवर कचरा संकलन बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे. वीज बिलाची तब्बल 5 कोटी रुपये एवढी रक्कम थकल्याने नगर महापालिकेसमोर हा पेच निर्माण झाला आहे.
नगर महापालिकेला कचरा संकलन करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून पैसे येतात. पण अद्यापही ते आले नाहीत. त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, आज किंवा उद्या (दि. 23) थकित वीजबिलापोटी महावितरण कंपनीला 45 लाख रुपयांचा धनादेश द्यावा लागणार आहे. ही तरतूद कशी करायची, हा प्रश्न महापालिका प्रशासनाला सध्या भेडसावत आहे.
… तर मनपा कर्मचाऱ्यांनाच करावं लागणार कचरा संकलन …!
वीजबिलाचे 5 कोटी रुपये थकल्यानं कालपासून (दि. 21) कचरा संकलन आणि व्यवस्थापन बंद आहे. या बिलाची व्यवस्था झाली नाही तर कचरा संकलन बंद राहिलं तर महापालिकेला पर्यायी व्यवस्था म्हणून नगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच कचरा संकलन करावं लागणार आहे.