लेटेस्ट न्यूज़कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

spot_img

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी रक्कम १,५०,०००/- रुपये नुकसान भरपाई देण्याचे मा. कामगार न्यायालयाचे आदेश.

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेक्याचा ठेकेदार मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे यांच्या चार कंत्राटी कामगारांना अन्यायकारक व चुकीच्या पध्दतीने कामावरुन काढून टाकल्याचे सिध्द झाल्याने कंत्राटदाराने प्रत्येक कामगारांसाठी रक्कम १,५०,०००/- रुपये नुकसान भरपाई येत्या तीन महिन्यात देण्याचे आदेश अहिल्यानगर येथील मा. प्रथम कामगार न्यायाधिश श्री. शरद जी. देशपांडे यांनी दिले आहेत.

अहिल्यानगर महानगरपालिकेने सन २०१९-२०२३ कालावधी साठी पुणे येथील मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट या कंत्राटदार कंपनीशी करार करुन घनकचरा उचलणे व वाहतुक करण्याचे काम सदर कंत्राटदार कंपनीला दिले होते.

सदर कामावर कामगार नामे अक्षय उमाप, किशोर उल्हारे, सचिन उमाप, सुभाष वाघमारे हे कंत्राटी पध्दतीने सफाई कामगार होते. सन २०२० साली निर्माण झालेल्या कोविड च्या परिस्थितीत या कामगारांनी जिवाची परवा न करता महापालिका क्षेत्रातील कचरा उचलण्याचे व वाहतुकीचे काम प्रामाणिपणे केलेले होते. परंतू, असे असतानाही २०२१ साली सदर कामगारांना कंत्राटदाराने कोणतेही कारण नसताना तसेच कोणतेही म्हणणे मांडण्याची संधी न देता अचानक कामावरुन काढून टाकले होते. त्यामुळे कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळून उपासमारीची वेळ आली होती. कामगारांनी अनेकदा विनंती करुनही कंत्राटदाराने कामगारांना पुन्हा कामावर रुजु करुन घेण्यास नकार दिला, त्यामुळे संबंधीत कामगारांनी येथील मावळा प्रतिष्ठाण संस्थेचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील यांच्या मार्फत मा.सहा. कामगार आयुक्त, अहिल्यानगर व कामागार उपायुक्त, नाशिक विभाग यांचेकडे तक्रार केल्यानंतर सदरचे प्रकरण अहिल्यानगर येथील प्रथम कामगार न्यायालयेकडे वर्ग झाले होते.

कामगार न्यायालयात सदर प्रकरणात समोर आलेले पुरावे, तसेच कामगारांचे वकील अॅड. गणेश पुरी यांनी केलेला युक्तीवाद व इतर आवश्यक त्या कायदेशीर बाबींचा विचार करुन संबधीत कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने कुठलेही कारण न देता नोकरीमधून तडकाफडकी बडतर्फ केल्याचा निष्कर्ष काढला व कंत्राटदाराची सदरची कृती ” अनुचीत कामगार प्रथेमध्ये मोडत असल्याने कामगार नुकसान भरपाई रक्कम रुपये एक लाख पन्नास हजार मिळण्यास पात्र आहे असा निर्णय कामगार न्यायालयाने दिला आहे. तसेच सदर रक्कम आदेश झाल्यापासून तिन महिन्याच्या आत रोख स्वरुपात देण्याचे आदेश मे. कामगार न्यायालयाने संबंधीत कंत्राटदारास दिलेले आहेत. सदर निकालामुळे संबधीत कामगारांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर येथील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. निलेश म्हसे पा. यांनी या प्रकरणात सुरुवातीपासून कामगारांच्या पाठीशी उभे राहुन पाठपुरावा केला व कामगारांना न्याय मिळुन देण्यासाठी प्रयत्न केले.

कामगारांच्या वतीने कामगार न्यायालयात ऍड. गणेश नवनाथ पुरी, ऍड. जी. व्ही. सातपुते व एड. अर्चना संजय गोसावी यांनी काम पाहून कामगारांना न्याय मिळण्यासाठी आवश्यक ते कायदेशीर पुरावे व प्रकरणाशी संबधीत इतर महत्वाच्या बाबी मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...