राहुरी – राहुरी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अपहरण झालेल्या 37 व्या अल्पवीयन मुलीचा शोध घेऊन सुटका करण्यात आली. एका आरोपीला अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेवुन आज रोजी तिची सुटका करून तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून तिचा सविस्तर जबाब नोंदवून सदर पीडितेस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपी ऋतिक दिलीप धोत्रे राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी यास अटक करण्यात आली. आरोपीकडे विचारपूस करून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करत आहेत.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सन 2016 मध्ये अपहरन झालेली एक मुलगी, सन 2021 मध्ये अपहरण झालेल्या 2 मुली, सन 2022 मध्ये अपहरण झालेली एक मुलगी, सन 2023 मध्ये अपहरण झालेल्या 5 अल्पवयीन मुली तसेच सन 2024 मध्ये अपहरण झालेले एकूण 23 मुली, व 5 मुले असे एकूण 37अपहरित बालकांचा(32मुली व 5 मुले ) जानेवारी 2024 पासून शोध घेवून त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देवून अपहरण करणाऱ्या 37 आरोपींना अटक करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पोसई धर्मराज पाटील, पोहे का राहुल यादव, अशोक शिंदे,पोकॉ. गणेश लिपणे पोकॉ. शेषराव कुटे, मपोहेकॉ. स्वाती कोळेकर मपोकॉ. वृषाली कुसळकर नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर व पो.ना.सचिन धनाड, पो.ना.संतोष दरेकर, पो.ना.रामेश्वर वेताळ नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि.अहमदनगर मोबाईल सेल यांनी केलेलाआहे.