गुन्हेगारी एसपी साहेब! 'रत्नदीप'च्या मुलींनी स्थानिक पोलिसांना दिलेले तक्रार अर्ज भास्कर मोरेकडे कसे...

 एसपी साहेब! ‘रत्नदीप’च्या मुलींनी स्थानिक पोलिसांना दिलेले तक्रार अर्ज भास्कर मोरेकडे कसे गेले, याचा जाब विचाराल?

spot_img

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेची बातमी वाचल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. जामखेड तालुक्यातल्या रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या भास्कर मोरेकडून त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींवर ज्या पद्धतीने आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आले, त्याची नुसती कल्पना जरी केली, तरी पालकांच्या छातीत धस्स व्हायला होतं. विशेष म्हणजे ज्या पोलीस बांधवांवर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, त्या पोलिसांवरच या अत्याचारित मुलींकडून संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याचे एसपी राकेश ओला यांना आमचा जाहीर सवाल आहे, की एसपी साहेब, ‘रत्नदीप’च्या मुलींनी स्थानिक पोलिसांना दिलेले तक्रार अर्ज भास्कर मोरेकडे कसे गेले, याचा जाब विचाराल?

रत्नदीप कॉलेजच्या मुलींनी कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्याशी बोलताना त्यांच्यावर घडलेला अमानवी प्रसंग सविस्तरपणे सांगितला. या प्रसंगाबद्दल सांगताना अत्याचारित मुलींना अक्षरशः रडू कोसळलं. या मुलींनी आमदार रोहित पवारांना सांगितलं की ‘आम्ही पाच जणींनी स्थानिक पोलिसांना भास्कर मोरेविरुद्ध अर्ज दिला होता. त्या अर्जावर तर कारवाई झाली नाहीच. मात्र तो अर्ज थेट भास्कर मोरेपर्यंत गेला. त्या अर्जावरून मोरेने आम्हाला प्रचंड ‘टार्गेट’ केलं.

भास्कर मोरे हा आमच्या प्रत्येक वैयक्तिक गोष्टीत लक्ष घालतो. त्याच्या मनासारखं वागलं नाही तर रिव्हाल्वर काढून तो मुलींना मारण्याची धमकी देतो. त्याने आम्हाला खूप त्रास दिला आहे. आमचं आयुष्य त्यानं उध्वस्त केलं आहे. चारचौघात सांगता न येणारी पण माणुसकीला काळिमा फासणारी अनेक कृत्यं त्यानं आमच्याशी केली आहेत’.

शिवप्रतिष्ठानचे पांडुराजे भोसले आणि उपोषणार्थी विद्यार्थ्यांसमवेत आमदार रोहित पवारांनी तब्बल पाच तास चर्चा केली. या कॉलेजच्या तपासणीसाठी विद्यापीठाची समिती आली तर या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनींनाच रुग्ण बनवून सलाईन लावले जाते, असा भयानक गौप्यस्फोटदेखील मुलींनी यावेळी बोलताना केला. न शिकवतादेखील तुम्हाला डिग्री मिळणारच आहे. त्यामुळे पैसे भरा आणि मोकळे व्हा,  असंदेखील मोरे सांगत असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

आम्हाला कॉलेज दलून द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. या मागणीचा गंभीरपणे विचार करु आणि कॉलेज बदलून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी उपोषणकर्ते विद्यार्थ्यांना यावेळी दिली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ! मोरेचं काळं साम्राज्य उध्वस्त कराच !

प्रत्येक आई, बहीण आणि मुलींचा सन्मान करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. हिंदवी स्वराज्यातल्या एका बहिणीची अब्रू लुटणाऱ्या रांझे गावच्या पाटलाचे दोन्ही हात छत्रपती शिवाजी महाराजांनी कलम करण्याचे आदेश दिले होते. जो चुकतो, तो कितीही जवळचा असला तरी त्याला अजिबात माफी नाही, असा शिरस्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. आजमितिला महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन गृहमंत्री फडणवीस यांनी मोरेचं काळं साम्राज्य उध्वस्त करावंच आणि या सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना न्याय मिळवून द्यावा, असं साकडंदेखील आम्ही या निमित्तानं गृहमंत्री फडणवीस यांना घालत आहोत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...