लेटेस्ट न्यूज़एसपी राकेश ओला साहेब! अहमदनगरच्या 'ट्रॅफिक ब्रँच'चं मनुष्यबळ वाढवाल?

एसपी राकेश ओला साहेब! अहमदनगरच्या ‘ट्रॅफिक ब्रँच’चं मनुष्यबळ वाढवाल?

spot_img

ट्रॅफिकच्या म्हणजे रहदारी किंवा वाहतुकीची वर्दळ याबद्दल राज्यात सर्वात गचाळ आणि बेशिस्त शहर कोणतं, असा जर प्रश्न कोणी विचारला तर सगळ्यात आधी अहमदनगर हे उत्तर ऐकू येईल. याला कारणंही तशीच मजबूत आहेत. पहिलं कारण म्हणजे या शहरातल्या कोणालाच वाहतूक नियमांचं काहीही देणं घेणं राहिलेलं नाही. आता ही जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या अहमदनगर ‘ट्रॅफिक ब्रँच’च्या नावानं विनाकारण आगपाखड करण्यात काहीच अर्थ नाही. या वाहतूक शाखेचं मनुष्यबळ वाढविण्याची खरी गरज आहे. म्हणून मुद्दाम हे विचारावसं वाटतं, की एसपी राकेश ओला साहेब, अहमदनगरच्या ‘ट्रॅफिक ब्रँच’चं मनुष्यबळ वाढवाल?

अहमदनगर शहरात जो कोणालाही धक्का न लाग देता वाहन चालवतो, त्याला जगाच्या पाठीवर कुठेही अडचण येणार नाही, असंही अहमदनगरच्या वाहतूक व्यवस्थेबद्दल बोललं जातं. अर्थात या बोलण्याचा उद्देश अहमदनगरच्या ‘ट्रॅफिक ब्रँच’ची थट्टा करणं, हा मुळीच नाही. तर सांगायचं असं, की अहमदनगर ‘ट्रॅफिक ब्रँच’च्या या अशा विचित्र परिस्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत.

पहिला घटक म्हणजे अहमदनगर महापालिका. कारण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निष्क्रियतेमुळे या शहरातल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत की रस्तेच खड्ड्यांमध्ये गेले आहेत, हे मोठं अनाकलनीय असं कोडं झालंय. अहमदनगर महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे अनेक चौकातले सिग्नल्स बंद आहेत. याचा अहमदनगर ‘ट्रॅफिक ब्रँच’च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्षच झालं.

महापालिकेच्या निष्क्रियतेचा फटका नगरकरांना तर बसतो आहेच. पण याचा सर्वात जास्त त्रास अहमदनगर’ट्रॅफिक ब्रँच’च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होतो, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. या वाहतूक नियंत्रण शाखेत किमान 50 कर्मचाऱ्यांची आणि पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची गरज आहे. मात्र या शाखेतले पोलीस कर्मचारी वाढविण्याऐवजी कमी करण्यात आल्याचं समजलं. त्यामुळेच एसपी राकेश ओला यांचं या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्याच्यासाठीच खरं तर आमचा हा लेखन प्रपंच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...