लेटेस्ट न्यूज़एसटी महामंडळाचे एक कोटी गेले ठेकेदाराच्या घशात... ! सोनईच्या बसस्थानकाची डागडुजी...

एसटी महामंडळाचे एक कोटी गेले ठेकेदाराच्या घशात… ! सोनईच्या बसस्थानकाची डागडुजी निकृष्ट दर्जाची…!

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनई बसस्थानकाची नुकतीच डागडूजी करण्यात आली आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाला असून या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते अरुण चांदघोडे यांनी ‘महासत्ता भारत’शी केलीय.

या कामावर खर्च करण्यात आलेले एक कोटी 69 लाख रुपये ठेकदाच्या घशात गेले आहेत. आधीच एसटी महामंडळ तोट्यात असताना ही आर्थिक उधळपट्टी कशासाठी, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

सोनई बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंनी एसटी बसेसची ये – जा सुरु असते. या दोन्ही बाजूला नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचा जो कोणी ठेकेदार आहे, त्यानं अतिशय अरुंद अशा पद्धतीनं रस्त्याचं काँक्रीट केलं आहे.

या रस्त्यावर जर दोन बसेस एकत्र आल्या तर दुसऱ्या बसला रस्तादेखील शिल्लक ठेवण्यात आलेला नाही. एकूणच हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून त्याची चौकशी करण्याची मागणी, चांदघोडे यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...