स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्हयातील 23 अवैध धंदयावर छापे टाकुन कारवाई…
कारवाईमध्ये आरोपीकडून 1,83,875/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त!
अहिल्यानगर – जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन च्या हद्दीत असणाऱ्या अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 04/05/2025 रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका, श्रीरामपूर शहर, नेवासा, श्रीगोंदा व राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदयाची माहिती काढुन 23 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. कारवाईमध्ये अवैध दारू व जुगार याबाबत खालील नमूद पोलीस स्टेशनला एकुण 23 गुन्हे दाखल करून आरोपीचे ताब्यातुन 1,83,875/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
विविध पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई पुढीलप्रमाणे
1 नगर तालुका 3 दारूबंदी केसेस 32,500/- आरोपी संख्या 3
2 श्रीरामपूर शहर 11 दारूबंदी केसेस 1,14,870/- आरोपी संख्या 11
3 नेवासा 5 दारूबंदी केसेस 5,320/- आरोपी संख्या 5
4 श्रीगोंदा 3 दारूबंदी केसेस 10,585/- आरोपी संख्या 3
5 राहुरी 1 जुगार 20,600/- आरोपी संख्या 12
सदर कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशाप्रमाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, मयुर गायकवाड, रोहित येमुल, गणेश भिंगारदे, मनोहर गोसावी, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, सुनिल मालणकर, अरूण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे, अशोक लिपणे, किशोर शिरसाठ, अतुल लोटके, हृदय घोडके, सागर ससाणे, गणेश लोंढे, विशाल तनपुरे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर व उमाकांत गावडे अशांचे अशांचे 05 पथक तयार करून त्यांना जिल्हयातील पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई केली.