गुन्हेगारीएक गावठी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या इसमास तोफखाना...

एक गावठी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या इसमास तोफखाना पोलीसांनी केले जेरबंद..

spot_img

एक गावठी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या इसमास तोफखाना पोलीसांनी केले जेरबंद..

अहिल्यानगर – दि. 27/03/2025 रोजी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पपिंग स्टेशन रोड ते कराळे जिम जाणारे रोडवर एक पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम गावठी कट्टा स्वतःच्या कब्जात बाळगुन आहे. आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी बातमी मिळाल्यान पोलीस निरीक्षक श्री. आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पो. स्टे चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंपिग स्टेशन रोड ते कराळे जिम रोड येथे सापळा लावून मिळालेल्या बातमी प्रमाणे पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम दिसुन आल्याने त्यास घेराव घालून मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल मधुकर गायकवाड, बय 29 वर्षे, रा. नालेगांव, वारुळाचा मारुती, सहा नंबर इमारात ता जि अहिल्यानगर असे सांगितले. छाप्या दरम्यान सोबत असलेल्या पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक 40,000/-रु कि.चा गावठी बनावटीचे पिस्तुल व एक 500/- रु किंचे जिवंत काडतूस मिळून आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. राकेश ओला सो, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे सो, अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग प्रभार नगर शहर विभाग श्री.संपतराव भोसले सो, मा. पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी. पाटील, पो.हे.कॉ अहमद इनामदार, भानुदास खेडकर, वसिमखान पठाण, पो.कॉ सुमित गवळी यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वंचित बहुजन आघाडीच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत बोर्डे यांची निवड 

वंचित बहुजन आघाडीच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी श्रीकांत बोर्डे यांची निवड  पाथर्डी (प्रतिनिधी )-आज मंगळवार...

Barti बार्टी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार..!

Barti बार्टी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार..! कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे महासंचालक सुनील वारे यांचे...

कोट्यवधिच्या सरकारी जमिनी व सवलती लाटणारी धंदेवाईक रुग्णालये!

कोट्यवधिच्या सरकारी जमिनी व सवलती लाटणारी धंदेवाईक रुग्णालये! महाराष्ट्रात एकूण किती मोठी हॉस्पिटल्स धर्मदाय नोंदणी...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं अक्षम्य दुर्लक्ष…! विवाहितेचा मृत्यू…! आमदार अमित गोरखेंनी केली कारवाईची मागणी…!

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं अक्षम्य दुर्लक्ष...! विवाहितेचा मृत्यू...! आमदार अमित गोरखेंनी केली कारवाईची मागणी...! महासत्ता भारत...