राजकारणउमेदवारी नाकारल्याने खा. राजेंद्र गावित नाराज.. सहज जिंकू शकलो असतो...

उमेदवारी नाकारल्याने खा. राजेंद्र गावित नाराज.. सहज जिंकू शकलो असतो असा दावा; नाराज असलो, तरी महायुतीचेच काम करणार!

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघ कोणाच्याही वाट्याला गेला, तरी राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील असे आश्वस्त केल्यानंतरही अचानक उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे खासदार राजेंद्र गावित नाराज आहेत. त्यांच्या मनात डावल्याचे दुःख आहे. आपण या निवडणुकीत सहज विजयी झालो असतो; परंतु काही नेत्यांच्या खेळीमुळे उमेदवारी डावल्याची सल त्यांच्या मनात आहे.

गेल्या सहा वर्षात पालघर लोकसभा मतदारसंघात केलेल्या विविध कामांच्या जोरावर आपली कार्यकर्त्याची फळी तयार झाली होती आणि संघटनात्मक बांधणी चांगली होती. त्यामुळे दुसऱ्या पद्धतीत सर्व कार्यकर्त्यांचे पाठबळ आपल्याशी होते. वरिष्ठांकडूनही उमेदवारीचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार मतदारसंघात एक फेरी पूर्ण केली होती; परंतु अचानक उमेदवारी डावलण्यात आल्याने खासदार गावित यांना दुःख लपवता आले नाही.

पालकमंत्र्यांचे राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्याचे आश्वासन
दरम्यान, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी खासदार गावित यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप त्यांना दिला. लोकसभेच्या निवडणुकीत संधी मिळाली नसली, तरी राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्याचे आश्वासन त्यांना दिले; परंतु या आश्वासनावर खासदार गावित फारसे समाधानी दिसले नाहीत. वरिष्ठ नेत्यांना आता काय करायचे आणि काय आश्वासन द्यायचे हे त्यांनी ठरवायचे आहे असे सांगून राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्याबाबतच्या पालकमंत्र्यांच्या आश्वासनावर त्यांनी कानावर हात ठेवले.

काही नेत्यांच्या कानभरणीने उमेदवारी गेली
महायुतीतील काही नेत्यांनी वरिष्ठांचे काम भरले. काहींनी नकारात्मक अहवाल दिला. त्यामुळे माझ्याविषयी अकारण नकारात्मक मत तयार झाले; परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. दुसऱ्या फळीतील सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत होते. पालघर लोकसभा मतदारसंघात गेल्या सहा वर्षात तन-मन-धनाने काम केले. लोकांचा विश्वास संपादित केला. त्यामुळे निवडणूक माझ्या दृष्टीने फारसी अवघड नव्हती; परंतु उमेदवारी डावलण्यात आली. हा प्रकार योग्य नाही. असे असले तरी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली नाराजी आणि नैराश्य मी दूर करीन आणि महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मी कार्यकर्त्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

चांगले काम करणाऱ्यांनाच अडथळे
एखादी व्यक्ती किंवा नेता चांगले काम करतो, त्या वेळी त्याला अडथळा अपेक्षित धरावाच लागतो. मी या जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर काम केले. स्थलांतर, मजूर, शेतकरी, मच्छीमार, गौण खनिजावर आधारित रेती, वीट, दगड, माती गौण खनिजावर अवलंबून असलेल्या समाजाचे तसेच रेती काढणाऱ्या खलाशी, आदिवासींचे प्रश्न मी सोडवले होते. अनेक कामे प्राधान्याने केली होती. मच्छीमारांसाठी अनेक कामे केली. असे असतानाही काहींनी मुद्दाम माझ्याविषयी गैरसमज निर्माण केले; परंतु असे असले तरी उमेदवारी नाकारल्याने स्वस्थ न बसता महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे खा. गावित यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...