राजकारणउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच 'टार्गेट' का केलं जातंय? जरांगे पाटलांची 'स्क्रीप्ट' 'सिल्व्हर...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ‘टार्गेट’ का केलं जातंय? जरांगे पाटलांची ‘स्क्रीप्ट’ ‘सिल्व्हर ओक’मधून : आमदार नितेश राणे यांचा आरोप तर जरांगे काय बोलले, हे पाहून बोलणार : उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं स्पष्टीकरण

spot_img

राज्याचं राजकारण आज (दि. २५) पुन्हा एकदा ढवळून निघालं. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योध्दा’ मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असताना अचानक त्यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला.

ही सारं दृश्यं वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त व्हायला सुरुवात झाली. आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय, की ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ‘टार्गेट’ का केलं जातंय? जरांगे पाटलांची ‘स्क्रीप्ट’ ‘सिल्व्हर ओक’मधून येत असल्याचा आरोप आ. राणे यांनी केला. तर जरांगे पाटील काय बोलले, हे पाहून आपण बोलणार आहोत, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय.

दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका घेऊ नये. यामुळे त्यांची इतक्या महिन्यांची आंदोलनाची वाया जाईल. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सदावर्ते यांनी यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते शरद पवार हेच आहेत, असा दावा करत जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या परिक्षेचा कालखंड ध्यानात घेऊन त्यांना वेठीस धरु नये, असं आवाहन केलं.

या सर्व भानगडींचे कर्ते धर्ते शरद पवारच…?

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं जे आमरण उपोषण सुरु केलं, तेव्हापासून या आंदोलनाला शरद पवार आणि रोहित पवार यांचं आर्थिक पाठबळ आहे, असा आरोप केला जात होता. या मागणीसोबतच जरांगे पाटलांनी सरकारनं सग्यासोयऱ्यांचं विधेयक मंजूर करावं, ही मागणी लावून धरली. त्यांनी वेळोवेळी जी भूमिका बदलली किंवा बारस्कर यांच्या म्हणण्यानुसार बंद दाराआड जी काही तडजोड केली, हे सर्व लक्षात घेता या आंदोलनाचे शरद पवार हेच कर्ते धर्ते आहेत, असा सूर राज्यभरात आळवला जात आहे.

राज्य सरकार केंद्र सरकारला घाबरतंय का? आमदार रोहित पवार यांचा सवाल

मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योध्दा’ मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. २५) जो काही अचानकपणे आक्रमक पवित्रा घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत, त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय, ‘राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. मराठा समाजाला कसं आणि कधी आरक्षण देणार, हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे. हा विषय केंद्र सरकारच्या हातात आहे. त्यामुळे या सरकारनं केंद्राकडे जावं. परंतु हे सरकार केंद्र सरकारला घाबरत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...