युवा विश्वउद्याचं रास्तारोको आंदोलन होणार ; पण 25 नंतर रास्तारोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात...

उद्याचं रास्तारोको आंदोलन होणार ; पण 25 नंतर रास्तारोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात : मनोज जरांगे पाटील यांची माहिती

spot_img

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि सग्यासोयऱ्यांच्या विधेयकाला मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी उद्या (दि. 24) सकाळी 10 ते 1 यावेळेत राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय. अंतरवाली सराटीत सुरु असलेल्या उपोषणादरम्यान जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘उद्याचं रास्ता रोको आंदोलन केलं जाणार असलं तरी मराठा समाजबांधवांना खास विनंती आहे, की विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या वेळेत कुठल्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, ही काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. विद्यार्थिनींना या रास्ता रोको आंदोलनामुळे परिक्षेला जाण्यासाठी अडचणी आल्यास मराठा समाज बांधवांनी त्या अडचणी दूर करायच्या आहेत.

चर्मकार, बंजारा आणि अन्य काही समाजाचे उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्या उत्सवाला काहीच अडचणी येणार नाहीत, यांची काळजी मराठा समाज बांधवांनी घ्यायची आहे. उलटपक्षी मराठा समाज बांधवांनी त्या उत्सवात सहभागी व्हायचं आहे. मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भुमिकेत आहे. कोणाला त्रास होईल, अशी भूमिका मराठा समाज कधीच घेत नाही. ‘येवल्याचं यडं’ सोडलं तर सर्व समाज आपल्या पाठीशी आहेत’.

… रास्ता रोको आंदोलनाचं रुपांतर धरणे आंदोलनात…!

उद्याच (दि. 24) रास्ता रोको आंदोलन वगळता त्यानंतर दि. 25 फेब्रुवारीपासून करण्यात येणाऱ्या रास्ता रोको आंदोलनामध्ये जरांगे पाटील यांनी बदल केले आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कालावधी आहे कोणत्याही विद्यार्थ्याला वंचित राहावं लागणार नाही यासाठी यापुढे रास्ता रोको आंदोलन करण्याऐवजी प्रत्येक गावात आणि शहरात धरणे आंदोलन करा, अशा सूचना जरांगे पाटील यांनी यावेळी दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...