गुन्हेगारीउघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी...!

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी…!

spot_img

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी…!

अहिल्यानगरजवळ असलेल्या भिंगारलगतच्या वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत अनेक महिला रात्रीच्या वेळी उघड्यावरच शौचास बसत आहेत. परिणामी परिसरातलं आरोग्य धोक्यात आलं आहे.
यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे या रस्त्यावरून येणारे जाणारे नागरिक व येथील रहिवासी नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. अशी स्थानिक ग्रामस्थांची तक्रार आहे.या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलिसांचं एक पथक पहाटे व रात्रीच्या वेळी नेमण्यात यावं. या पथकाकडून शौचास बसणाऱ्या महिलांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यासाठी वडारवाडी ग्रामपंचायतची ग्रामसभा बोलविण्यात आली होती. या ग्रामसभेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावावर वडारवाडी ग्रामपंचायत अधिकारी अभय सोनवणे आणि प्रशासक रविंद्र माळी यांच्या सह्या आहेत.

ग्रामपंचायत सार्वजनिक शौचालय बांधायला हतबल…! – वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी जागाच शिल्लक नाही. रात्रीच्या अंधारात एका खाजगी भूखंडावर अनेक महिला शौचास बसत आहेत. ही ग्रामपंचायत सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यासाठी केवळ जागेअभावी हतबल आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..!

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..! माळशिरस: - माळशिरस नगरपंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार...

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल नवटाकेंविरोधात फसवणूक...

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं मुंबई...

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात कंत्राटी कामगारांचाच बोलबाला…! एसीबी ने लक्ष देण्याची आवश्यकता..,

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात कंत्राटी कामगारांचाच बोलबाला...! एसीबी ने लक्ष देण्याची आवश्यकता.., एखाद्या कंत्राटी कामगाराला...