लेटेस्ट न्यूज़ईव्हीएम हॅक होऊ शकतं ; तात्काळ रद्द करा : अमेरिकेच्या 'या' श्रीमंत...

ईव्हीएम हॅक होऊ शकतं ; तात्काळ रद्द करा : अमेरिकेच्या ‘या’ श्रीमंत उद्योगपतीनं केली मागणी …!

spot_img

मानव किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए आय) या तंत्रज्ञानाद्वारे इलेक्ट्रॉनिक मशीन्स (ईव्हीएम) हॅक होण्याचा धोका खूप जास्त आहे. त्यामुळे ही ईव्हीएम मशीन तात्काळ रद्द करा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी केली आहे.

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मस्क यांची ही मागणी महत्त्वपूर्ण समजली जात आहे. या निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे डेमोक्रॅटिक तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.

ईव्हीएमबद्दल भारत सरकारची भूमिका काय?

अमेरिकेत ईव्हीएमला होत असलेला विरोध लक्षात घेता भारतात काय परिस्थिती आहे, हे सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचं झालं आहे. भारतात नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक ईव्हीएम मशीनच्या आधारावरच घेण्यात आली आणि विधानसभेतही तेच चित्र राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये पारदर्शकता नक्की असते का आणि ईव्हीएम हॅक होणं, या संदर्भात भारत सरकारची नक्की भूमिका काय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...