नेवासे तालुक्यातल्या सोनई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिकल मोटर आणि जनरेटरच्या चोरीचा तपास लावण्यात यश मिळवलं आहे. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आप्पासाहेब तमनर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी केली.
या कारवाईत पाच हॉर्स पॉवरचे दोन इलेक्ट्रिकल पंप आणि इतर असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चोरी प्रकरणी सुदाम गिरिधर पालवे यांनी 5 जून रोजी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
संपत उर्फ संदीप दादाभाऊ सांगळे आणि ऋषिकेश भाऊसाहेब केकान या दोघांना सोनई पोलिसांनी नेवासे तालुक्यातल्या महालक्ष्मी हिवरे येथून ताब्यात घेतलं. पोलीस हेडकॉन्स्टेबल अप्पासाहेब तमनर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.