गुन्हेगारीआरटीओ मॅडम! विना नंबरचे डंपर तुमच्या भरारी पथकाला दिसतच नाहीत का? भरारी...

आरटीओ मॅडम! विना नंबरचे डंपर तुमच्या भरारी पथकाला दिसतच नाहीत का? भरारी पथकावर तुमचा वचक राहिला नाही का? तुमच्या विभागानं माणसं मारायची सुपारी घेतलीय का?

spot_img

आरटीओ मॅडम! विना नंबरचे डंपर तुमच्या भरारी पथकाला दिसतच नाहीत का? भरारी पथकावर तुमचा वचक राहिला नाही का? तुमच्या विभागानं माणसं मारायची सुपारी घेतलीय का?

नगर आरटीओ हा विभाग आणि त्या विभागाअंतर्गत काम करत असलेलं भरारी पथक हे फक्त आणि फक्त नावापुरतंच राहिलं आहे की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. नगर शहर हद्दीत विना नंबरचे डंपर सर्रासपणे धावत आहेत. भरधाव वेगात जात असलेल्या या डंपर्समुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. नगरच्या आरटीओ मॅडम आणि भरारी पथकालाही हे डंपर्स दिसत नाहीत का? नगर आरटीओनं माणसं मारण्याची सुपारी घेतलीय आहे का, अशा प्रकारचा सवाल संतप्त नगरकरांमधून उपस्थित केला जात आहे.

नगर शहरातून अनेक प्रकारचे महामार्ग जात आहेत. या महामार्गांवर असे विना नंबरचे डंपर्स प्रचंड वेगाने धावत आहेत. रात्रंदिवस धावत असलेल्या या डंपर्समुळे सामान्य माणसाचा जीव धोक्यात आला आहे. एखाद्या वाहन चालकाकडे वाहनाची कागदपत्रं नसतील किंवा वाहन चालविण्याचा परवाना नसेल तर पोलीस त्या माणसाशी ‘खाऊ की गिळू’ अशा पद्धतीनं वागतात. मात्र तुम्ही पाहत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका पाठोपाठ तीन विना नंबरचे डंपर्स पोलिसांच्या समोरून जात आहेत. पोलिसांची गाडीदेखील सायरन वाजवत जात आहे. त्यामुळे या तीन डंपर्सना पोलीस बंदोबस्त तर देण्यात आला नाही ना, अशी शंकादेखील या निमित्तानं उपस्थित केली जात आहे.

विना नंबरच्या डंपर्सकडून अपघात झाला आणि त्या अपघातात एखाद्याचा जीव गमावला तर त्याची जबाबदारी नक्की कोणावर आहे? आरटीओचे नियम फक्त सामान्य माणसालाच आहेत का, विना नंबरचे हे डंपर्स कुणाच्या मालकीचे आहेत? कुठं चालले आहेत? या डंपरच्या मालकांची आणि नगर आरटीओतल्या अधिकाऱ्यांची काही ‘आर्थिक’ देवाण-घेवाण आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर नगरकरांना मिळावी, अशी अपेक्षा आहे. नगर आरटीओच्या मॅडम या संदर्भात काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...