अँन्टी करप्शनआरटीओ अधिकाऱ्यासह एजेंटला ३ लांखांची लाच घेताना एसीबी ने रंगेहाथ पकडले...

आरटीओ अधिकाऱ्यासह एजेंटला ३ लांखांची लाच घेताना एसीबी ने रंगेहाथ पकडले…

spot_img

आरटीओ अधिकाऱ्यासह एजेंटला ३ लांखांची लाच घेताना एसीबी ने रंगेहाथ पकडले…

नवापूर आरटीओ चेक पोस्ट नाक्यावर नियुक्ती देण्यासाठी तडजोडी अंती ३ लाखांची लाच स्वीकारताना प्रादेशिक परिवहन कार्यालयात छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह एजेंटला ३ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाई मुळे लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ACB च्या ब्रेकिंग बातम्यांसाठी “महासत्ता भारत न्यूज” ग्रूप ला ऍड व्हा..

तक्रारदार हा ५५ वर्षीय पुरुष असून यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर २०२४ या महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून ₹. ३,००,००० (तीन लाख रुपये) लाचेची मागणी दीपक अण्णा पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव. यांनी मागणी करून खाजगी इसम भिकन मुकुंद भावे वय, ५२ वर्ष, खाजगी इसम, जळगाव. या एजेंट मार्फत लाच स्वीकारली असता RTO दीपक अण्णा पाटील, वय ५६ वर्ष, व्यवसाय- नोकरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ता.जि.जळगाव. एजेंट भिकन मुकुंद भावे वय, ५२ वर्ष, खाजगी इसम, रा.आदर्श नगर प्लॉट नं.९८, जळगाव. यांना ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे एम.आय.डी.सी जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई मेहरून तलाव जवळ, फ्लॅट न.३,१० लेक होम अपार्टमेंट, जळगाव या घटनास्थळी करण्यात आली.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुख्य अधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वीच दीपक पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या बदलीनंतर अनेक महिने ते पद रिक्तच होते. आज दिनांक ५ डिसेंबर गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावत कारवाई केली.

प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांच्या कोल्हापूर, ठाणे, सांगली, नगर येथील घरांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. यात अनेक बेनामी संपत्तीसह मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदर कारवाई सापळा अधिकारी अमोल धस पोलीस निरीक्षक, सापळा सहाय्यक अधिकारी- सुरेश नाईकनवरे, पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि छत्रपती संभाजी नगर, पो हेकॉ अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, पोअंम, विलास चव्हाण सचिन बारसे, सी एन बागुल ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सागर शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजकपदी निवड

नगर-येथील शेंडी ग्रामपंचायतीचे सदस्य,शिवभक्त सागरभाऊ शिंदे यांची अहिल्यानगर दक्षिण भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजक...

पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करणार; राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्याचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन…!

पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करणार; राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्याचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन...! महासत्ता...

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार, छाननीत गडबड आढळल्यास 1500 रुपये बंद होणार..

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार, छाननीत गडबड आढळल्यास 1500 रुपये...

दिव्यांग वधू व वर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळाले- लोकसेवक युवराज दाखले

दिव्यांग वधू व वर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळाले- लोकसेवक युवराज दाखले पिंपरी -प्रतिनिधी,...