गुन्हेगारीआयुक्त डॉ.पंकज जावळे साहेब! सुलभ शौचालयातले 'ते' दारुडे नगरकरांना सर्रास 'घोडे' लावत...

आयुक्त डॉ.पंकज जावळे साहेब! सुलभ शौचालयातले ‘ते’ दारुडे नगरकरांना सर्रास ‘घोडे’ लावत आहेत; काय करतंय तुमचं ‘डिपार्टमेंट’?

spot_img

आयुक्त डॉ.पंकज जावळे साहेब! सुलभ शौचालयातले ‘ते’ दारुडे नगरकरांना सर्रास ‘घोडे’ लावत आहेत; काय करतंय तुमचं ‘डिपार्टमेंट’?

अहमदनगर शहरातल्या गांधी मैदान परिसरात असलेल्या एका सुलभ शौचालयात एक महिला आणि दोन पुरुष असे तिघेही दारु पिऊन नगरकरांना अक्षरशः घोडे लावत आहेत अर्थात घाणेरड्या शिव्यांची लाखोली वाहत आहेत. या सुलभ शौचालयाचा ठेका मुंबईतल्या कुठल्या तरी ठेकेदाराला देण्यात आला आहे. मात्र हे तिघे त्या शौचालयात गेल्या अनेक दिवसांपासून दारु ढोसून धिंगाणा घालत आहेत.

या अशा परिस्थितीत अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना तमाम नगरकरांमधून विचारणा केली जात आहे, की सुलभ शौचालयातले ‘ते’ दारुडे नगरकरांना सर्रास ‘घोडे’ लावत असताना तुमचं ‘डिपार्टमेंट’ काय करतंय? या तीन व्यक्तींचा आणि संबंधित ठेकेदाराचा संबंध काय आहे? या व्यक्ती संबंधित ठेकेदारानं सदर शौचालयात कामाला ठेवल्या आहेत का?

धक्कादायक बाब अशी आहे, की महिलांना सुलभ शौचालय मोफत असताना ती महिला शौचालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेकडून पाच – दहा रुपये उकळते आहे. महिलांकडून पैसे घेण्याची मुभा दारु पिऊन तर्र असलेल्या या महिलेला कोणी दिली? अहमदनगर महापालिकेच्या संबंधित विभागाचं याकडे लक्ष आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.

आयुक्त डॉ. जावळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताहेत? – अहमदनगर शहरातले अनेक प्रश्न यापूर्वी विविध प्रकारच्या माध्यम प्रतिनिधींनी कित्येक वेळा उपस्थित केले आहेत. दुर्दैवानं आयुक्त डॉ. जावळे यांच्याकडून या प्रश्नांकडे सातत्यानं डोळेझाक करण्यात आल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. उदा. केडीएमसीचा कथित घोटाळा, शेतकऱ्याच्या मरण पावलेल्या गायी, रस्त्यांची बोगस कामं, उखडलेले रस्ते आदींसह अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असताना आयुक्त डॉ. जावळे या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताहेत, अशी शंका यानिमित्तानं व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...