राजकारणआमदार शिवाजीराव कर्डिले यांना उत्कृष्ट चेअरमनचा पुरस्कार..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उत्कृष्ट चेअरमनचा पुरस्कार..!

spot_img

आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उत्कृष्ट चेअरमनचा पुरस्कार…!

गोवा:-14 – राज्य सहकारी बँका (SCB) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCB) यांच्या साठी इनजेनियस लीडरशिप समिट आणि आयकॉनिकलीडर अवॉर्ड 2024 या वर्षी गोव्यातील विंडफोलवर या पंचतारांकित रिसॉर्ट येथे संपन्न झाला.

2024 चा जिल्हा सहकारी बँकेतील उत्कृष्ठ चेअरमन म्हणून कामगिरी बद्दल अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना 2024 बेस्ट चेअरमन चा पुरस्कार राट्रीय सहकारी संघ,नवी दिल्लीचे चेअरमन मा.खा.श्री. दिलीप संघवी यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

या प्रसंगी गोवा विधानसभा अध्यक्ष नामदार श्री अनंत शेट, गोवा राज्याचे नामदार श्री.सुभाष फल देसाई, मंत्री समाज कल्याण, नदी व जलवाहतूक आणि पुरातत्व शास्त्र तसेच भारतातील राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष, सीईओ,अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्विकारल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले,जिल्हा बँकेवर विश्वास ठेऊन रुपये दहा हजार कोटीच्या वर ठेवीददरांनी ठेवी ठेवल्या असून जवळपास साडेसात हजार कोटीचे कर्ज येणी बाकी असून मी जिल्हा बॅंक व सामाजिक कार्याच्या माध्यमातून शेतकरी व समाजातील शेवटचा घटकांची सेवा करण्याचे कार्य केल्याने मला हा पुरस्कार मिळाला. राजकीय जीवनात हा पहिलाच पुरस्कार असल्याचेही माहिती श्री. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

श्री.शिवाजीराव कर्डिले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटिल, मा.खासदार सुजय विखे पाटील,विविध जिल्हा बॅंकांचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्तानी अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने… महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने... महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या...

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन… शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय समोर असंतोष धरणे आंदोलन यशस्वी

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन... शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय...

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी… राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गत उपक्रम

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी... राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री...

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न अहिल्यानगर - महिलांनी विविध क्षेत्रात आपले कौशल्य...