राजकारणआमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा...

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

spot_img

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

भारत पवार – महासत्ता भारत/अहिल्यानगर

नगर राहुरी मतदार संघात यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुरी तालुक्यातल्या वांबोरीत सभा घेतली. त्या सभेत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अनेक विरोधकांनी कर्डिले यांच्यावर कडवट टीका केली होती. विशेष म्हणजे या सभेनंतर माजी मंत्री कर्डिले यांचा पराभव अटळ असल्याचं तनपुरे समर्थकांमध्ये बोललं जात होतं. त्यामुळे माजी मंत्री कर्डिलेंच्या विजयाचा मार्ग काहीसा कठीण बनल्याचंही दिसत होतं. परंतू माजी मंत्री कर्डिले यांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी झालेल्या सर्वच सहकाऱ्यांच्या ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’मुळे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले पुन्हा एकदा आमदार झाले.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, पं.स.सदस्य राहुल पानसरे, महेश झोडगे, राम पानमाळकर, रोहित भुजबळ, रवी फल्ले, बाळासाहेब तागडकर आदींसह माजी मंत्री कर्डिले यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी या निवडणुकीत अतिशय बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत प्रचाराचं उत्कृष्ट नियोजन केलं होतं. नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी केकती, सैनिक नगर या भागात अतिशय उत्तम नियोजन करून मतदान घडून आणले. माजी मंत्री कर्डिले यांच्या विरोधात काम करणाऱ्यांना व्यवस्थितरित्या विश्वासात घेऊन माजी मंत्री कर्डिले यांची भूमिका समजून सांगितली गेली.नाराज असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन त्यांच्या नक्की काय काय अडचणी आहेत, मतदार संघाच्या विकास कामांसंदर्भात कोणाकोणाच्या काय काय संकल्पना आहेत, माजी मंत्री कर्डिले यांच्या कामाविषयी स्थानिक मतदारांना नक्की काय वाटतं, अशा अनेक प्रश्नांवर माजी मंत्री कर्डिले यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मनापासून चिंतन करत त्यानुसार प्रचाराचं नियोजन केलं. लोप्रत्येक गावातल्या ग्रामस्थांच्या भेटी घेण्यात आल्या. माजी मंत्री कर्डिले यांनी केलेल्या कामासंदर्भात सविस्तर अशी माहिती मतदारांना देण्यात आली. याचा परिणाम असा झाला, की माजी मंत्री कर्डिले यांना पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली.

अक्षय कर्डिले यांचं उत्कृष्ट नियोजन…!

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे बरेचसे राजकीय सद्गुण त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्यात उतरले असल्याची प्रचिती यावेळच्या निवडणुकीत सर्वांनाच आली. अक्षय कर्डिले यांनी वडिलांप्रमाणेच सर्वच वयोगटातल्या मतदारांशी अतिशय विश्वासाचं नातं निर्माण केलं. नगर राहुरी मतदार संघातल्या युवक कार्यकर्त्यांची मोठी फळी अक्षय कर्डिले यांनी तयार केली. त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक युवक कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते सर्व करण्यासाची तयारी अक्षय कर्डिले यांनी दाखवत हजारो लोकांचा विश्वास संपादन केला. अक्षय कर्डिले यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना या निवडणुकीत काहीसा अवघड असलेला विजय मिळवणं सोपं झालं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...