आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई: काय म्हणाले रोहित पवार..!
ईडीने रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोच्या कन्नड युनिटवर दोन दिवसांपूर्वी जप्ती आणली. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या कारवाईला राजकीय सुडापोटी कारवाई म्हटले.
त्यांनी सांगितले की, कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी घाबरू नये. ईडीच्या प्रेसनोटमध्ये अनेक चुका असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवारांनी टेंडर नियमानुसार भरल्याचा दावा केला आणि हायेस्ट बीडवाला तांत्रिक मुद्द्यावर रिजेक्ट झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी ईओडब्ल्यूने यापूर्वीच क्लीन चीट दिल्याचा उल्लेख करत ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रोहित पवारांनी म्हटले की, ते महायुती सरकारविरोधात आवाज उठवत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी असेही म्हटले की, निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जेलमध्येही टाकलं जाऊ शकतं, पण त्यालाही सामोरं जायची माझी तयारी आहे.
रोहित पवारांनी गौप्यस्फोट करत भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटातील काही नेत्यांच्या फाईल्स त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवल्या गेल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले की, ते लढाईतून मागे हटणार नाहीत आणि कदापीही स्वाभिमान गहाण ठेवणार नाहीत.
रोहित पवार यांच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.