आमदार अमित गोरखे यांचा पिंपरी-चिंचवड, मावळ हद्दीतील नदी विकास प्रकल्पाला (RFD) विरोध …!
महासत्ता भारत
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यादरम्यान विधानभवनामध्ये प्रवेश करते वेळी पिंपरी-चिंचवडच्या पवना, मुळा, इंद्रायणी प्रकल्प रद्द करा, Beauty treatment नको, पिंपरी – चिंचवडच्या पवना, मुळा, इंद्रायणीसाठी RFD च्या नावाखाली ! वृक्षतोड थांबलीच पाहिजे,
या आशयाचे पोस्टर घेऊन आमदार अमित गोरखे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रवेश केला.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येत पिंपरी चिंचवड शहरातील 500 हून अधिक सामाजिक संस्था या एकत्र येऊन संपूर्ण शहरभर मानवी साखळीद्वारे आंदोलन सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) नदी विकास प्रकल्पाला (RFD) विरोध आमचा विरोध आहे. वृक्षतोड थांबलीच पाहिजे, आधी नद्या स्वच्छ करा आणि नद्या वाचवू, निसर्ग टिकवू!अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी आमदार गोरखे यांनी नदीसंवर्धनाचा संदेश दिला.
नद्यांचे नैसर्गिक स्वरूप अबाधित ठेवण्याची मागणी त्यांनी केली. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचे संवर्धन ३० लाखांहून अधिक नागरिकांसाठी महत्त्वाचे असल्याचं अधोरेखित केलं.
बांधकाम आणि कृत्रिम सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणे हे मान्य नसल्याचंहीत्यांनी स्पष्ट केले. आमदार गोरखे यांच्या
या आंदोलनांनाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.