लेटेस्ट न्यूज़आपापसात वाद मिटविणे महत्वाचे: न्यायाधीश अंजू शेंडे...  राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

आपापसात वाद मिटविणे महत्वाचे: न्यायाधीश अंजू शेंडे…  राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

spot_img

आपापसात वाद मिटविणे महत्वाचे: न्यायाधीश अंजू शेंडे… 
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन
अहिल्यानगर, ता. १०: प्रत्येकाला आपले हक्क मिळावे, यासाठी न्यायाची स्थापना झाली. आपले अधिकार मिळविण्यासाठी आपण न्यायालयात येतो, अधिकारांना मिळविण्यासाठी आपआपसातले वाद सामंजस्याने मिटवू शकतो. चांगला समाज तयार करण्यासाठी आपण चांगली वृत्ती आणि नको असलेली प्रकरणे काढण्याची तयारी ठेवावी. लोकन्यायालयामध्ये प्रकरणे सामजस्यांने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार आणि सेंट्रल बार असोशिएशन, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार (ता. १०) राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले. राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन रोपट्यास पाणी घालून पक्षकार आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे अध्यक्ष्स्थानावरून बोलत होत्या. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. एच. शेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश कातोरे, सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी, पोलिस उपअधीक्षक गणेश उगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला न्यायिक अधिकारी, विधिज्ञ आणि पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. ॲड. राजाभाऊ शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. भक्ती शिरसाठ यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री संजय शिरसाठ साहेब, मातंग समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करा; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष नियुक्ती करा व बजेट वाढवा…!

मंत्री संजय शिरसाठ साहेब, मातंग समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करा;  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक...

शिर्डीतील १६ अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..!

स्थानिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडमध्ये तब्बल 16 अवैध धंद्यांवर छापे दारू व जुगार अड्डे...

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या कल्याणमध्ये..  नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे..,

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या कल्याणमध्ये..  नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे.., केंद्रीय गृह विभागाच्या...