गुन्हेगारीआत्महत्येचा प्रयत्न करणं गुन्हा आहे ना ? मग शेवगाव पोलिसांनी का केलं...

आत्महत्येचा प्रयत्न करणं गुन्हा आहे ना ? मग शेवगाव पोलिसांनी का केलं असावं दुर्लक्ष? सरकारी यंत्रणेला माहिती न देणाऱ्या ‘त्या’ खासगी डॉक्टरला सहआरोपी केलं जाणार का?

spot_img

आत्महत्येचा प्रयत्न करणं, हा आपल्या देशात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 309 नुसार गुन्हा आहे. परंतु शेवगावच्या पूर्व भागात राहणाऱ्या एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या घटनेची बातमी एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये ‘शेअर मार्केटच्या नावाखाली ठेवी घेणाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न’ अशा मथळ्याखाली प्रकाशितही करण्यात आली. मात्र शेवगाव पोलिसांचं याकडे का दुर्लक्ष झालं असावं, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणं हा गुन्हा असताना शेवगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे ज्या तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला, त्या तरुणाला सरकारी रुग्णालयात दाखल न करता खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु ही बाब सरकारी यंत्रणेच्या लक्षात आणून देण्याची जबाबदारी त्या खासगी डॉक्टरची होती. त्यामुळे त्या खासगी डॉक्टरला सहआरोपी केलं जाणार का, असा प्रश्नदेखील या निमित्तानं शेवगावकरांमधून उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यातल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित उत्तरे न देता केवळ वेळकाढूपणा केला. ‘ठाणे अंमलदार चहाला गेले’, जेवायला गेले’, ‘जेवण करुन आल्यानंतर साहेबांच्या केबिनमध्ये गेले’, अशी उत्तरं देण्यात आली.

तत्पूर्वी शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरु आहे, नंतर बोलतो’, असं त्यांनी सांगितलं. मात्र एक – दोन तासांनी व्हिसी संपल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन कट केला. जनहित लक्षात घेऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संपर्क साधला असतानादेखील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पत्रकारांशी अशा प्रकारचं ‘असहकार आंदोलन’ असेल तर जनतेला खरी माहिती कशी मिळणार, हाच खरा प्रश्न आहे.

जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘प्लेन क्लोद’ नावाचा एक विभाग कार्यरत असतो. या विभागातल्या कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या प्रत्येक घटनेवर करडी नजर असते. मात्र एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न करुनही या विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती कशी मिळाली नाही, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो.

… म्हणून तक्रारदार पुढे येईनात…?

अधिकृतपणे शेअर मार्केटचे कामकाज करणाऱ्या मंडळींव्यतिरिक्त काहींनी त्यांचीच ‘कॉपी’ करत अक्षरशः 17 ते 22 टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवत हजारो लोकांकडून ठेवी म्हणून घेतले. यामध्ये कोणी 50 लाख, कोणी एक कोटी, कोणी दोन कोटी, अशी आर्थिक गुंतवणूक केली. मात्र कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक होऊनदेखील याप्रकरणी तक्रार द्यायला कोणी पुढे येत नाही. याचं कारण असं सांगितलं जातं, की तक्रार देणाऱ्याला इतके पैसे कुठून आले, असं विचारलं तर त्याचे उत्तर काय द्यायचं, हा मोठा प्रश्न असल्यामुळे यामध्ये तक्रारदार पुढे यायला धजावत नाहीत, अशीदेखील चर्चा शेवगावकरांमध्ये रंगली आहे.

शेअर मार्केटमध्ये भूसंपादनाचा पैसा ?

शेवगाव परिसरात वेगवेगळ्या सरकारी कामासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्या बदल्यात अनेकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक मोबदला मिळालेला आहे. हा पैसा कुठे गुंतवायचा, ही या संबंधित लोकांची समस्या असताना शेवगावमध्ये शेअर मार्केटचे अनेक प्रतिनिधी फिरत असून आम्ही तुमच्या पैसा दुप्पट करु, आमच्याकडे गुंतवणूक करा, या अंतर्गत वेगवेगळ्या योजना सांगून लोकांना आमिष दाखवत आहेत. एका अर्थाने भूसंपादनाचा मिळालेला आर्थिक मोबदला शेअर मार्केटमध्ये तर गुंतविला जात नाही ना अशीदेखील शंका या निमित्तानं व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...