गुन्हेगारी... आता शांत बसणार नाही, 'त्याचं' टाळकं फोडून त्याला परत पाठवेन !...

… आता शांत बसणार नाही, ‘त्याचं’ टाळकं फोडून त्याला परत पाठवेन ! अभिनेत्री केतकी चितळेनं दिला सज्जड दम…!

spot_img

‘फक्त तीन मिनिटांत ब्राह्मण संपवू’, असा सोशल मिडियावर व्हिडिओ करणाऱ्या तरुणासह आणि त्याला अटक होताच त्याच्या सुटकेसाठी पोलिसांना आदेश देणाऱ्या एका आमदाराचा अभिनेत्री केतकी चितळे हिनं चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. केतकीच्या घरी मागे एकदा एका तरुणाला कोणी तरी पाठवलं होतं. त्या तरुणाला म्हणे केतकीनं समजावून परत पाठवलं. ‘पण आता जर कोणी माझ्या घराकडे आलं तर शांत बसणार नाही, त्या तरुणाचं टाळकं फोडून त्याला परत पाठवेन’, असा सज्जड दमच केतकीनं दिलाय.

फेसबुकवर व्हायरल केलेल्या एका व्हिडीओत केतकी चितळे म्हणते, ‘एखाद्यानं एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करणारे आम्ही नाहीत. आम्ही भगवान परशुरामांना मानणारे आहोत आणि त्यांच्या हातात कोणतं शस्त्र असतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे’. तीन मिनिटांत ब्राह्मण संपवू, अशी भाषा बोलणाऱ्या त्या युवकाला अटक झाली आणि पावसात भिजणाऱ्या आजोबाच्या आमदार असलेल्या नातवानं पोलिसांवर दबाव आणून त्या युवकाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.

आम्ही काही बोललो, की अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. पण उघड उघड ब्राह्मण द्रोह करणाऱ्यांबद्दल आम्ही काहीच बोलायचं नाही का? दरम्यान, केतकी चितळेच्या या दमबाजीचा परिणाम ब्राह्मण द्वेषाची भावना असणाऱ्या लोकांवर कितपत होईल, हा प्रश्नच आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना आणि तमाम ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवू, वायफळ बडबड करणारा युवक आणि त्याला वाचविणारा तो आमदार लोकशाहीवर दिवसाढवळ्या बलात्कार करत नाहीत का, असादेखील प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...