शिवसेनेचे धनुष्यबाण, राष्ट्रवादीचे घड्याळ गेल्यानंतर आता काँग्रेसचे चिन्ह असलेल्या ‘पंजा’वर गंडांतर आलं आहे. काँग्रेस चिन्ह काढून घ्यावं किंवा बदलून टाकावं, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाची या संदर्भात काय भूमिका आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष लोकसभा निवडणूक लढवत नसला तरी या पक्षानं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष एकत्र लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किंबहुना तसे संकेत राज ठाकरेंनी दिले आहेत. दरम्यान, काँग्रेसचा पंजा हे चिन्ह काढून टाकल्यानंतर काँग्रेसला कोणतं चिन्ह मिळेल, याचीही अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.