मनोरंजनआकाशवाणी अहमदनगर केंद्रांचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरु 📻 ...

आकाशवाणी अहमदनगर केंद्रांचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरु 📻 जुन्या लोकप्रिय कार्यक्रमांसोबत नव्या कार्यक्रमांची मेजवानी 🎯

spot_img

अहमदनगर (प्रतिनिधी) : बऱ्याच दिवसापासून बंद असलेल्या आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु झाले . या सायंकालीन प्रसारणाने श्रोत्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

१४ एप्रिल १९९१ मध्ये आकाशवाणी अहमदनगर केंद्राची स्थापना झाली होती. तेव्हापासून विविध कार्यक्रमांद्वारे ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची त्रिसूत्री अंगीकारत या केंद्राने श्रोत्यांचे मनोरंजन केले. मात्र काही दिवसांपासून या केंद्राचे सायंकालीन प्रसारण बंद झाल्यामुळे स्थानिक कलाकार, लेखक, विचारवंत आणि रसिक श्रोत्यांमध्ये नाराजी होती.
तसेच सायंकालीन प्रसारणात स्थानिक कार्यक्रमाऐवजी मुंबई, विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होत होते. परिणामी बऱ्याच लोकप्रिय कार्यक्रमांची वेळ कमी करण्यात आली होती. तर काही कार्यक्रम वेळेअभावी रद्द करावे लागत होते. मात्र ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजून २ मि. पासून रात्री ११ वाजून १० मि. पर्यंत आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे स्थानिक प्रसारण श्रोत्यांसाठी पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आले आहे.
 पूर्वीप्रमाणेच प्रसारण पुन्हा सुरू झाल्यामुळे आता नगर शहर, जिल्ह्यातील श्रोत्यांना आणि news on AIR मोबाइल अँपच्या माध्यमातून जगभरातल्या श्रोत्यांना आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम आता कुठेही ऐकता येणार आहेत. यामध्ये लोकसंगीत, कौटुंबिक श्रुतिका – विचारमंथन, लोकजागर, व्यक्तीवेध, ओळख कायद्याची, हॅलो गीतबहार, रजनीगंधा, युववाणी, किसानवाणी, आमचं शेत आमचा परिसर, शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत इत्यादी लोकप्रिय कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. याशिवाय श्रोत्यांचा सहभाग असणारे फोन गाणी, आपली आवड, आपकी पसंद, गीतबहार, हॅलो डॉक्टर हे कार्यक्रम आता एका तासाचे करण्यात आल्याने श्रोत्यांमध्ये याविषयी आनंदाचे वातावरण आहे. तसेच नारीशक्ती, चला करूया पर्यटन, सुहाना सफर यांसारखे नवीन कार्यक्रम सुरु होणार असल्यामुळे नव्याने सुरु झालेल्या प्रसारणाविषयी आणि नव्या कार्यक्रमाविषयी श्रोत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...

शासनाकडून अवघ्या १ रुपया वार्षिक भाडेपट्ट्यावर लता मंगेशकर फाउंडेशनला मिळालेल्या जमिनीवर सरकारी बोजाही चढला

शासनाकडून अवघ्या १ रुपया वार्षिक भाडेपट्ट्यावर लता मंगेशकर फाउंडेशनला मिळालेल्या जमिनीवर सरकारी बोजाही चढला...