अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पी.एस.आय.राजेंद्र वाघ यांचे सुपुत्र रोहित याची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी निवड
महासत्ता भारत / अहिल्यानगर
पंजाबच्या चंदीगड इथं होणाऱ्या ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पीएसआय राजेंद्र वाघ यांचे सुपुत्र रोहित वाघ यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात रोहित हे पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
रोहित वाघ सध्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कमुनिकेशनमध्ये एमबीएच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. यापूर्वी रोहित वाघ यांनी पुण्यातल्या बालेवाडी शूटिंग रेंज इथं झालेल्या विभागीय स्पर्धेत चौथे स्थान मिळवले होते. त्यापूर्वी रोहित वाघ यांनी तामिळनाडू इथं पार पडलेल्या 33 व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग स्पर्धेत रोहित वाघ यांनी 50 मीटर प्रकारात कांस्यपदक स्पर्धक मिळविले होते.
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (एन आर ए आय) नवीदिल्ली इथं डॉक्टर करणसिंग शूटिंग रेंजवर होणाऱ्या 67 व्या स्पर्धेत रोहित वाघ सहभागी होणार आहेत.
दरम्यान, रोहित वाघ हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवराज ससे आणि सविता मताने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या वाटचाल करत आहेत.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ.संजय बी.चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्यासह तमाम विद्यार्थ्यांनी रोहित वाघ यांचं या कामगिरीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.