राजकारणअहिल्यानगर शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधून फौजदारी कारवाई सुरू करणार गोविंदपुरात अनधिकृत...

अहिल्यानगर शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधून फौजदारी कारवाई सुरू करणार गोविंदपुरात अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा

spot_img

अहिल्यानगर शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधून फौजदारी कारवाई सुरू करणार

गोविंदपुरात अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल

अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा

अहिल्यानगर – शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. शहराच्या विविध भागातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधून संबंधित नळ धारकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे. गोविंदपुरा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालमत्ताधारकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे नळ कनेक्शन अनधिकृत असल्यास ते तत्काळ अधिकृत करून घ्यावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

गोविंदपुरा परिसरात नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घरासमोर महानगरपालिकेची परवानगी न घेता रस्ता फोडून अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न एका मालमत्ताधारकाने केला. त्यासाठी १५ फूट लांब रस्ता खोदण्यात आला. संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी कठोर कारवाई करत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार गंभीर असून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक व नुकसान करणारा आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत संपूर्ण शहरात अशा प्रकारे अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शहरात ज्या मालमत्ताधारकांकडे अनधिकृत नळ कनेक्शन आहेत, त्यांनी त्यांचे नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत नळ कनेक्शन तत्काळ अधिकृत करून घ्यावे, त्यासाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्हापरिषदेचा अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडला..!

यशस्वी सापळा कारवाई ▶️ युनिट - अहिल्यानगर. ▶️ तक्रारदार- पुरुष,वय-60 वर्षे ▶️ आरोपी - अशोक मनोहर शिंदे,...

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय…! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का ‘ॲक्शन’?

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय...! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का 'ॲक्शन'? महासत्ता भारत / अहिल्यानगर गोरगरिबांच्या...

स्वच्छतेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होईल: आमदार संग्राम जगताप प्रत्येक नगरकराने शहर स्वच्छतेची जबाबदारी घ्यायला हवी: आयुक्त यशवंत डांगे

स्वच्छतेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होईल: आमदार संग्राम जगताप प्रत्येक नगरकराने शहर स्वच्छतेची...

बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यानां कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करा – आ.संग्राम जगताप

बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यानां कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करा - आ.संग्राम जगताप अहिल्या नगर...