अंकुश शिंदे/श्रीगोंदे : – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून ओबीसी बहुजन पार्टीकडून बारा बलुते दाराना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी पंकजा मुंडे, छगन भुजबळ, महादेव जानकर, यांचा माघार घेण्यासाठी राजकीय दबाव आला तरी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच विजय शिवतारे यांच्या सारखी माघार घेणार नाही अगर कुठलीही तडजोड करणार नाही असे प्रतिपादन सेवानिवृत्त आयुक्त दिलीप खेडकर यांनी केले.
आज गुरुवारी दि.11 रोजी श्रीगोंदे येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना पुढे म्हणाले की नगर दक्षिण लोकसभा मदारसंघात चार तालुके दुष्काळी असुन पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. रस्ते, वीज यासह सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी औद्योगिक वसाहत स्थापन करणे गरजेचे आहे. प्रश्न सोडविण्यासाठी याबाबत राजकीय नेते पदाधिकारी यांची उदासीन आहे. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी लोकसभा निवडणुक लढविणार असुन या मतदासंघात सुमारे १३ लाख ओबीसी बांधव आहेत.
ओबीसी बांधवांच्या सहकार्याने माझा विजय निश्चित आहे. निवडणुकीत माघार घेण्यासाठी ओबीसी नेते पंकजा मुंडे, छगन भुजबळ, महादेव जानकर यांनी राजकिय दबाव तंत्र वापरले तरी मी विजय शिवतारे याच्यासारखी माघार घेणार नाही असे सांगितले.
यावेळी वामन भदे, शिवाजी राऊत, बंडू कोंथिबीरे, साहेबराव रासकर, बबन श्रीराम, सुरेश सुपेकर आदी उपस्थित होते.