अहमदनगर एमआयडीसी मधील जुनी सह्याद्री कंपनी ,सह्याद्री चौक. भूखंड क्रमांक E-1 चे बेकायदेशीर रित्या औद्योगिक भूखंडातून वाणिज्य भूखंडामध्ये हस्तांतरण करूत अर्थांजनाच्या उद्देशाने छोटी छोटी प्लॉटिंग करून उच्च रेटमध्ये विक्री केले जात आहेत.
औद्योगिक महामंडळाने शेतकऱ्याकडून शेती विकत घेताना या जागेवरती फक्त औद्योगिक कंपनी स्थापन केली जाईल या उद्देशाने घेतले होते पण त्यांचा उद्देश बाजूला ठेवून हे विशिष्ट समाजाच्या लोकांनी एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून अर्थानजनासाठी तेथे प्लॉटिंगचे कार्य सुरू केलेले आहे.
औद्योगिक विकासाच्या नावाने येथील शेत जमीन शेतकऱ्यांकडून अत्यंत अल्प दरात विकत घेतली गेली होती. त्याचा स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना कसलाही फायदा झालेला नाही .यामुळे अनेक दिवस बंद असलेले सह्याद्री कंपनीची जागा परत आज स्थितीतील चालू मूल्यांकनाच्या आधारावर त्याच शेतकऱ्यांना परत मिळावी किंवा येथे राज्यातून मोठे औद्योगिक व्यवसाय परत सुरू करण्यात यावे किंवा या असंविधानिक कार्याला स्थगिती मिळावी म्हणून आदर्श जनरल कामगार संघटना संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण भैय्या सप्रे यांनी सदर भूखंडाबाबत उच्च न्यायालय संभाजीनगर (औरंगाबाद खंडपीठ) येथे जनहित याचिका क्रमांक 34 18 /2022 ही दाखल केलेली असून, जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही.
तोपर्यंत सदर कार्याची पूर्णतः स्थगिती मिळावी. अशा आशियाचे निवेदन प्रादेशिक अधिकारी औद्योगिक विकास महामंडळ नाशिक येथे विभागीय आयुक्त श्री. नितीन गवळी साहेब यांना देण्यात आले आहे. या कार्यासाठी जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे व श्री साई सामाजिक प्रतिष्ठान नवनागापूरचे अध्यक्ष आकाश कोल्हाळ यांनी सशक्त समर्थन जाहीर केले आहे.
सदर पत्राची संबंधित अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यास आदर्श कामगार संघटना संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय उग्र स्वरूपाचे अनिश्चित कालीन जन आंदोलन आझाद मैदान मुंबई अल्प वेळेत सूचना देऊन केले जाईल.