युवा विश्वनगर महापालिकेचे नवे आयुक्त देवीदास पवार यांच्या नियुक्तीचं समाधान ; पण सर्वच...

नगर महापालिकेचे नवे आयुक्त देवीदास पवार यांच्या नियुक्तीचं समाधान ; पण सर्वच विभागांतल्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी घेतलाय प्रचंड धसका…!

spot_img

अहिल्यानगर (अहमदनगर) महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार यांच्या नियुक्तीबद्दल नगरच्या स्थानिक नागरिकांमधून मनापासून समाधान व्यक्त केलं जात आहे. यापूर्वीचे आयुक्त जावळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप होऊन गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नगर महापालिकेला आयुक्त दर्जाचा अधिकारीच नव्हता. सुदैवानं पवार हे नगरच्या महापालिकेत आयुक्त म्हणून आले. साहजिकच नगरकरांमध्ये यामुळे समाधानाचं असल्याचं पाहायला मिळत वातावरण आहे.

असं असलं तरी महापालिकेच्या नगररचना, बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, आरोग्य,  पाणीपुरवठा अशा विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या आणि नगरकरांच्या डोक्यात ‘फिट्ट’ बसलेल्या काही घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी पवार यांच्या नियुक्तीचा चांगलाच धसका घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे.  महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित घोटाळ्यांपासून बांधकाम परवाने, ओढे नाले सपाटीकरण करुन त्या जागेवर मोठमोठ्या इमारती बांधण्याचा करण्यात आलेला प्रताप आणि अशा अनेक प्रकारच्या घोटाळ्यांची चौकशी होऊन आपल्या विरोधात करवाई होणार तर नाही ना, या संशयामुळे काही घोटाळेबाज अधिकाऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे. 

दरम्यान, आयुक्त पवार यांनी यापूर्वी यापूर्वी परळी, लातूर, विरार, यवतमाळ, उल्‍हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथे मुख्‍याधिकारी तसेच परभणी, जळगाव येथे आयुक्‍त या पदावर काम केलेलं आहे. त्यांची तब्बल २२ वर्षे प्रशासकीय सेवा झाली आहे.

अमरावती महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्त म्हणून ते कार्यरत होते. डॉक्टर प्रविण अष्टीकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर पवार यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार देण्यात आले होते. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात येथे सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. मूळ नांदेड जिल्ह्यातले रहिवासी असलेले पवार यांचे शिक्षण परभणी इथं झालं आहे.

1996 मध्ये त्यांची परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी यवतमाळ, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील पालिकांमध्ये मुख्याधिकारी (सीईओ) म्हणून कार्य केलं. आयुक्त जावळे यांच्यानंतर नवे आयुक्त पवार यांची कारकिर्द कशी राहिल, नगरवासियांच्या हिताचे निर्णय ते कशा पध्दतीनं घेतील, याविषयी स्थानिक नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...