अदखलपात्र गुन्ह्याच्या तपासात आरोपी महिलेला अटक करावीच लागेल, अशी तक्रारदारांना भिती दाखवून एका पोलीस कर्मचाऱ्यानं संबंधितांना 10 लाख रुपयांची लाच मागितली. मात्र तडजोडी अंती अवघ्या 6 हजार रुपयांची लाच घेताना एका सहाय्यक फौजदाराला अटक करण्यात आली आहे. गोविंद रघुनाथ मदगे असं लाचखोर सहाय्यक फौजदाराचं नाव आहे.
रायगड लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या आई-वडिलांविरुद्ध दिनांक 4 मार्च रोजी झटापट आणि विवाद केल्याबाबतची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी रोहा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. हे प्रकरण अदखलपात्र आणि कौटुंबिक असताना देखील आरोग्य महिलेला अटक करावी लागेल अशी भीती तक्रारदारांना लाचखोर सहाय्यक फौजदार मदगेनं दाखवली.
या गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचखोर सहाय्यक फौजदार मदगे याने तक्रारदाराला दहा हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तडजोडीनंतर सहा हजार रुपये घेताना रोहा बाजारपेठेतल्या वाहतूक चौकीजवळ मदगे याला अटक करण्यात आली. रोहा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाडावे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, शरद नाईक, पोलीस नाईक महेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ मगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.