गुन्हेगारीअर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आणखी एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक ...!

अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आणखी एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक …!

spot_img

भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) सध्या चांगलीच ‘ॲक्शन मोड’वर असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि जिल्हा बँकेचे संचालक असलेले अभिषेक जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अमरीश जयस्वाल यांनादेखील अटक करण्यात आलीय.

या दोघांनी कोणाला खबर लागून देता दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्रं जमा करत मलकापूर अर्बन बँकेतून नऊ कोटी रुपयांचं
कर्ज काढलं. ज्यावेळी या कर्जाचा भरणा झाला नाही, त्यावेळी बँकेनं जप्तीची नोटीस काढली असता संबंधित कागदपत्रं तपासल्यानंतर हा आर्थिक घोटाळा समोर आला.

दरम्यान, या आर्थिक घोटाळ्यामुळे आरबीआयनं मलकापूर अर्बन बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पैसे अडकल्याने हजारो खातेदार टेंशनमध्ये आले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन बँक व्यवस्थापकासह इतरांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्याचे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...