राजकारणअरे बेटा, पोलिसांचा बाप काढतो का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निलेश लंकेंची जाहीर...

अरे बेटा, पोलिसांचा बाप काढतो का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निलेश लंकेंची जाहीर सभेत केली कानउघडणी…!

spot_img

‘अरे काही अनुभव आहे की नाही? कोणीही उठावं आणि मला खासदार व्हायचं म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधायचं. मध्यंतरी समोरच्या उमेदवारानं ‘त्या पीआयला सांग रे, तुझा बाप येतोय’, असं वक्तव्य केलं होतं. अरे बेटा, पोलिसांचा बाप काढतो का? तु ज्या शाळेत शिकला, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची जाहीर सभेत कान उघडणी केली.

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय या महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यानं डॉ. विखे समर्थकांनी सभेत प्रचंड जल्लोष केला. दरम्यान, लंके यांनी पोलिसांवर केलेल्या त्या वक्तव्यामुळे पोलीस दलात खासगीत बोलताना नाराजी व्यक्त केली जात आहे.

ऐंशी टक्के पोलिसांची ‘कमळा’ला पसंती?

नगरच्या पोलीस मुख्यालयात आज (दि. १०) पोलीस बांधवांचं पोस्टल मतदान पार पडलं. लंके यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची नाराजी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदानातून व्यक्त केल्याचं बोललं जातंय. आज झालेल्या पोस्टल मतदानात ऐंशी टक्के पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाजपच्या कमळाला पसंती दिल्याची जोरदार चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...