गुन्हेगारीअरे बापरे! पुण्याच्या निगडीत एका महिलेसोबत 'हे' काय घडलंय ?

अरे बापरे! पुण्याच्या निगडीत एका महिलेसोबत ‘हे’ काय घडलंय ?

spot_img

‘पुणे तिथं काय उणे’ अशाप्रकारे पुण्याबद्दल बोललं जातं. त्याचं कारण असं आहे, की पुण्यात कधी काय घडले, हे अजिबात सांगता येत नाही. एकेकाळी विद्येचं माहेरघर असलेलं पुणे गुन्हेगारीचा अड्डा होतो की काय, अशी शंका यायला लागते. कारण पुण्यातल्या अलीकडच्या घटनांवर जर दृष्टिक्षेप टाकला तर पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीविषयी सर्वसामान्यांना चिंता वाटू लागलीय.

पुण्यातल्या निगडी परिसरात एका महिलेची तब्बल वीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. कंपनीसाठी जमीन देतो, असं सांगून एका भामट्यानं त्या महिलेकडून वीस लाख रुपये उकळले. मात्र विसार पावती करण्यास टाळाटाळ करुन हडपलेली रक्कमदेखील त्या महिलेला परत केली नाही. प्रसाद प्रदीप कोंडे Prasad Pradeep konde (रा. दत्तकृपा बंगला, जगदीश सोसायटी, धनकवडी, पुणे) असं त्या भामट्याचं नाव असून निगडी पोलिसांनी या प्रकरणी त्या भामट्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.

कोंडे याने त्याच्याकडे पंधरा आर जागा असल्याचं सांगून फिर्यादी महिलेला फसवलं आहे. या जागेचा फिर्यादी महिला आणि आरोपी मध्ये तीन कोटी 90 लाख रुपयांचा व्यवहार झाला. या व्यवहाराची 30 टक्के रक्कम घेऊन ईसर पावती देण्याचं ठरलं.

फिर्यादी महिलेनं कोंडे याला वीस लाख रुपये आरटीजीएसनं पाठवले. मात्र ईसर पावती करुन द्यायला त्याने टाळाटाळ केली. आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या महिलेनं निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी shatrughn Mali पुढील तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...