वक्फ बोर्डाचे अधिकार, वक्फ बोर्डाला दिलं जाणारं आर्थिक अनुदान ही सारी पंडित नेहरुंच्या काळातल्या काँग्रेसची ‘कर्तबगारी’ (?) आहे. महाराष्ट्रातल्या राज्याच्या कारभाऱ्यांनीसुद्धा नेहरुंच्याच पावलावर पाऊल ठेवत वक्फ बोर्डाला आर्थिक अनुदान दिलंय. यावरुन अभिनेत्री केतकी चितळे हिच्यासह अनेकांनी राज्य सरकारला सोशल मिडियावर प्रचंड ‘ट्रोल’ केलं आहे.
विशेष म्हणजे वक्फ बोर्डाला दिल्या जाणाऱ्या आर्थिक अनुदानापैकी बरीचशी रक्कम अखर्चित राहते. तरीही वक्फ बोर्डाला आर्थिक अनुदान दिलं जातं. एखाद्या हिंदू संस्थेला असं आर्थिक अनुदान देण्याची तरतूद भारतीय संविधानात का नसावी, असा प्रश्नदेखील यानिमित्तानं उपस्थित होत आहे.
या परिस्थितीवर अभिनेत्री केतकी चितळेचा संताप योग्य आहे का, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? याविषयी तुमची मतं तुम्ही बिनधास्तपणे व्यक्त करु शकता. काय म्हणतेय, अभिनेत्री केतकी चितळे, हे आता तुम्हीच पहा आणि ऐका.