ब्रेकिंगअभिमानास्पद उपलब्धी...! जिद्दी सिध्दार्थनं पुसलाय गुन्हेगारीचा शिक्का ...! पहिल्याच प्रयत्नात...

अभिमानास्पद उपलब्धी…! जिद्दी सिध्दार्थनं पुसलाय गुन्हेगारीचा शिक्का …! पहिल्याच प्रयत्नात मिळवला राजपत्रित अधिकारी होण्याचा मान…!

spot_img

अभिमानास्पद उपलब्धी…! जिद्दी सिध्दार्थनं पुसलाय गुन्हेगारीचा शिक्का …! पहिल्याच प्रयत्नात मिळवला राजपत्रित अधिकारी होण्याचा मान…!

गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या समाजात जन्माला आलेला सिद्धार्थ किसन चव्हाण हा कुठल्या मोठ्या शहरात किंवा नामांकित कोचिंग क्लासेसला जाऊन शिकला नाही. तर शेवगावसारख्या ग्रामीण भागात वास्तव्य करत जिद्दी सिद्धार्थनं समाजावर बसलेला गुन्हेगारीचा शिक्का यशस्वीपणे पुसला आहे. प्रा. किसन‌ चव्हाण यांचा मुलगा असलेल्या सिद्धार्थनं पहिल्याच प्रयत्नात भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये पेटंट अधिकारी क्लास वन राजपत्रित अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे.

शेवगाव शहरातल्या विद्यानगर इथं राहणाऱ्या सिद्धार्थची भारतीय प्रशासन सेवेमध्ये नुकतीच निवड झाली आहे. वंचित बांधवांचे मार्गदर्शक प्रा. किसन चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या प्रा. चव्हाण यांनी आयुष्यामध्ये अवहेलना, प्रचंड टोकाची गरिबी असताना खडतर संघर्ष केला. या संपूर्ण जीवन प्रवासाचं ‘आंदकोळ’ नावाच्या आत्मचरित्रामध्ये प्रा. चव्हाण यांनी वर्णन केलेलं आहे.

प्रा. चव्हाण यांचं ‘आंदकोळ’ हे पुस्तक सोलापूर मधील अहिल्यादेवी होळकर विद्यापिठामध्ये पदवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलं आहे. अशा या कर्तबगार बापाच्या मुलानं मोठी कामगिरी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने केला गुन्हा दाखल..!

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...