गुन्हेगारीअबब ! पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांकडून जप्त केली 4 कोटी रुपयांची कॅश? कुठं?...

अबब ! पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांकडून जप्त केली 4 कोटी रुपयांची कॅश? कुठं? वाचा सविस्तर…!

spot_img

देशभर सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. मात्र अशा परिस्थितीतदेखील तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना 4 कोटी रुपयांच्या रकमेसह पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण? सविस्तरपणे वाचा.

दक्षिण भारतात भाजपची सत्ता नाही. या भागात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. तामिळनाडूत काँग्रेस द्रमुकसोबत सत्तेत आहे. तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही काँग्रेस सत्तेत आहे. भाजपला दक्षिण भारतात कामगिरी सुधारायची असल्यानं पैशांचा वापर सुरू असल्याचं बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकीतले भाजपचे उमेदवार नयिनर नागेंद्रन यांच्या टीमने दिलेल्या सुचनेनुसार भाजपचे कार्यकर्ते 4 कोटींची ही रक्कम घेऊन जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, दहा लाखांपेक्षा जास्त रकमेची चौकशी करावी लागते, असं चेंगलपट्टूच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आहे.

जप्त करण्यात आलेली चार कोटी रुपयांची रक्कम प्राप्त कर विभागाकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये भाजप नेते आणि खासगी हॉटेलचा व्यवस्थापक सतीश, त्याचा भाऊ नवीन आणि ड्रायव्हर तिरुमल यांचा संबंध आहे. तामिळनाडूच्या 39 मतदारसंघात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...