अँन्टी करप्शनअन्न-औषध प्रशासन अधिकारी ४५ हजाराची लाच घेताना जाळ्यात

अन्न-औषध प्रशासन अधिकारी ४५ हजाराची लाच घेताना जाळ्यात

spot_img

कोल्हापूर : ४५ हजार रुपयांची लाच घेताना अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. अन्नसुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोनवणे (वय ५०, वर्षे, रा. लाईफ स्टाईल अपार्टमेंट, प्रतिभानगर, कोल्हापूर . मुळ गाव रा. राशीन, ता.कर्जत, जि. अहमदनगर) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी २० रोजी कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदाराचे वेफर्स आणि नमकीन या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अन्नसुरक्षा अधिकारी सोनवणे यांनी पाच ऑगस्ट रोजी भेट देऊन तपासणी केली आणि काही खाद्यपदार्थ सॅम्पल म्हणून घेऊन गेले. ताब्यात घेतलेल्या अन्नपदार्थांच्या आणि खाद्यपदार्थांच्या नमुन्यामध्ये कोणताही दोष नाही अशी कारवाई न करणेसाठी तसेच फर्मचे लायसन रद्द न करणेसाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीची खातरजमा करून पोलिसांनी आज मंगळवारी सापळा रचला तक्रारदाराकडून ४६ हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी अन्नसुरक्षा अधिकारी सोनवणे याला रंगेहाथ पकडले.

संशयित अधिकारी सोनवणे यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बापु साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, सुनील घोसाळकर, सुधीर पाटील, संगीता गावडे,सचिन पाटील यांनी कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...