लेटेस्ट न्यूज़अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत रॅगिंगचा प्रकार..! आठवीच्या विद्यार्थ्यांना...

अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत रॅगिंगचा प्रकार..! आठवीच्या विद्यार्थ्यांना नववीच्या विद्यार्थ्यांकडून मारहाण; प्रकरण मिटले होते पण व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रकरण उघडकीस: सहाय्यक आयुक्त कोरगंट्टीवार दाखल चारसदस्यीय समितीकडून चौकशी सुरू..,

spot_img

अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत रॅगिंगचा प्रकार..!

आठवीच्या विद्यार्थ्यांना नववीच्या विद्यार्थ्यांकडून मारहाण;

प्रकरण मिटले होते पण व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रकरण उघडकीस:

सहाय्यक आयुक्त कोरगंट्टीवार दाखल चारसदस्यीय समितीकडून चौकशी सुरू..,

जामखेड – जामखेड येथील अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध शासकीय निवासी शाळेतील इयत्ता आठवीच्या मुलांना नववीच्या मुलांना लाथाबुक्क्याने व पट्ट्याने मारहाणीची घटना दि. २१ रोजी घडली. सदर प्रकार रॅगिंग प्रमाणे असल्याने याबाबत एका मुलाने गोपनीरित्या व्हिडीओ चित्रण करून ठेवले होते. सदर निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा काबंळे यांना सदर घटना बुधवारी दि. २३ रोजी माहित झाली. त्यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण व्हिडीओ व्हायरल होताच राज्यात खळबळ माजली.

व्हिडिओ पहा

अहिल्यानगर येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंट्टीवार निवासी शाळेत दाखल झाले व त्यांनी तात्काळ सदर घटनेची त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली असून अहवाल आजच्या आजच मागवला आहे. जामखेड येथील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथील डॉ. अरोळे वस्ती येथे आहे. या इमारतीच्या शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह आहे तसेच जामखेड न्यायलय इमारत आहे.

या शासकीय निवासी शाळेत सहावी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व तेथेच मुलांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे. सदर शाळेत विद्यार्थ्यांची मारहाण नेहमी चालू असते. सर्व मुले अल्पवयीन असल्याने त्यांना समज देऊन दुर्लक्ष केले गेले. या शाळेत रॅगिंगचा प्रकार घडत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होती.  दि. २१ रोजी शाळा सुटल्यावर मुलामलांचे भांडणे झाली नववीचे मुले आठवीच्या मुलांना पट्टयाने अमानुष मारहाण करत आहे तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करत आहे. सदर घटना दोन दिवस होऊन निवासी शाळा मुख्याध्यापक व अधिक्षक यांना प्रकार माहीत नव्हता.

शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा काबंळे यांना हा प्रकार बुधवारी माहित झाला. त्यांनी याबाबत मुलांना व त्यांच्या आईवडिल यांना बोलावून घेतले. प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला.  मारहाणीचा व्हिडीओ बीड येथील एका कार्यकर्त्यांने व्हायरल करण्याचा इशारा दिला यानंतर जामखेड पोलीसांना सांगण्यात आले. पोलिसांनी सदर सर्व मुले व त्यांचे आईवडील यांना पोलीस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी या सर्वांना समज देऊन सोडून दिले.  गुरुवारी दुपारी निवासी शाळेतील मुलांना अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होताच अहिल्यानगर येथून सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंट्टीवार निवासी शाळेत आले. व यावेळी  पोलीस निरीक्षक महेश पाटील व मारहाण झालेल्या व मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आईवडिल यांची संयुक्त मिटिंग घेतली.

कोरगंट्टीवार यांनी तात्काळ चार सदस्यीय समिती नियुक्ती करून सदर प्रकरणाची चौकशी करून आजच संध्याकाळ पर्यंत अहवाल देण्यास सांगितले. रात्रीपर्यंत अहवाल येईल त्यानंतर काय कारवाई केली याबाबत माहिती मिळाली नाही.

सहाय्यक समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंट्टीवार यांनी मारहाण करणाऱ्या तीनही मुलांचे शाळेचे दाखले मुलांच्या पालकांच्या हातात समाजकल्याण आयुक्तांच्या आदेशान्वये देण्यात आले आहे. तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली निवासी शाळा व्यवस्थापन समितीचे नियुक्त करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

⚫⚫ मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा शिवसेना ठाकरे पक्षाने जाळला; पहेलगाम हल्ला पाकिस्तानचच षडयंत्र, केंद्र सरकारने करारा जवाब देत पाकड्यांची मस्ती...

⚫⚫ मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद... घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा शिवसेना ठाकरे पक्षाने जाळला; पहेलगाम हल्ला पाकिस्तानचच...

शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती

शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती मुंबई...

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...