गुन्हेगारीअनधिकृतपणे खोदलेल्या शेततळ्यातील चिखलात रुतून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू: अद्याप गुन्हा दाखल...

अनधिकृतपणे खोदलेल्या शेततळ्यातील चिखलात रुतून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू: अद्याप गुन्हा दाखल नाही..!

spot_img

श्रीगोंदा:- तालुक्यातील काष्टी पुनर्वसन येथे दि.1 एप्रिल रोजी बेकायदेशीरपणे महसूल विभागाची परवानगी नसताना अनधिकृतपणे खोदलेल्या शेततळ्यातील चिखलात रुतून समीर अंकुश बरकडे नावाच्या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला याला जबाबदार असणार्या राजकीय शेतमालकावर अजून पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल का झाला नाही. असा सवाल बरकडे च्या नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी दि.1 एप्रिल रोजी दुपारी समीर आणि त्याचा मूक बधिर मित्र पोहण्यासाठी गेले पण संबंधित राजकीय शेतकरी व्यक्तीने तेथे शेततळे न करता आपल्या अनधिकृत जागेतील मुरुम हा रेल्वे लाईनसाठी ठेकेदाराला लाखो ब्रास मुरूम विकला.तो मुरुम विकताना महसुल प्रशासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्यामुळे बेकायदेशीरपणे लाखो ब्रास मुरुम उत्खनन करुन पैसा कमविला पण शासनाला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरली नाही.

रेल्वे च्या कडेला शेततळे करताना परवानगी नसतानाही. केलेल्या शेततळ्याला कुठल्याही प्रकारची संरक्षण म्हणून सुरक्षा नाही. आणि त्याच खोदलेल्या खड्यात लहान मुलाचा नाहक बळी गेला याला जबाबदार कोण तर फक्त तो राजकीय शेतकरी आहे. घटना घडून सात दिवस झाले.तरी बरकडे कुटुंबातील सदस्यांना कोणती मदत नाही. घटनास्थळी पोलिस प्रशासन अथवा महसूल कर्मचारी यांनी साधा पंचनामा सुद्धा करण्याची तस्ती घेतली नाही एवढेच काय तर साधे फिरकले नाही.

कोणत्या राजकीय पुढारी व्यक्तीचा दबाव वाढला गंभीर घटना घडून सुद्धा कारवाई शुन्य आहे. हिच घटना सामान्य शेतकर्याची झाली असती तर आज तो तुरुंगात असता मग अशा व्यक्तींना प्रशासन पाठिशी का घालते यांची आता वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन संबंधित बेकायदेशीरपणे अनधिकृत शेततळे खोदलेल्या व्यक्तींवर कारवाई झाली पाहीजे. अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...