गुन्हेगारीअतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता नगरमध्ये दाखल ; कोतवाली पोलीस ठाण्याची पाहणी...

अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता नगरमध्ये दाखल ; कोतवाली पोलीस ठाण्याची पाहणी करत अधिकाऱ्यांशी केली चर्चा !

spot_img

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता हे वार्षिक तपासणीसाठी नगरमध्ये दाखल झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एसपी ऑफिसमध्ये त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक गुप्ता यांनी एसपी ओला यांच्या समवेत कोतवाली पोलीस ठाण्याची पाहणी केली. कोतवाली पोलीस ठाण्याची नवीन आणि प्रशस्त इमारत पाहून समाधान व्यक्त केलं.

वास्तविक पाहता अतिरिक्त पोलीस महासंचालक गुप्ता यांची मागील महिन्यातच भेट निश्चित करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती भेट  झाली नाही. दरम्यान, आजच्या भेटीत एडीजी गुप्ता यांनी कोतवाली पोलीस ठाण्यातल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पाहणी  केली. तसंच काही गुन्ह्यांची या भेटीत माहिती घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...