राजकारण'अजित दादा, नवाब मलिक'? 'हो, काही त्रास होतोय का'? पत्रकार तरी काय...

‘अजित दादा, नवाब मलिक’? ‘हो, काही त्रास होतोय का’? पत्रकार तरी काय बोलणार?

spot_img

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपनं नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करत प्रचंड विरोध केला होता. मात्र काल (दि. २) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठकीत नवाब मलिक सहभागी झाले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

या पार्श्वभूमीवर काही पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना छेडलं. स्पष्ट, परखड बोलणाऱ्या पण काहीशा फटकळ आणि ‘सनकी’ स्वभावाच्या
अजित पवार यांना पत्रकारांनी मोजक्याच शब्दांत विचारलं, ‘अजित दादा, नवाब मलिक’? अजित पवार उत्तरले, ‘हो, काही त्रास होतोय का’? आता अजित पवार यांच्या या प्रश्नावर पत्रकार तरी काय बोलणार, हाच खरा प्रश्न आहे.

नवाब मलिक पावसाळी अधिवेशनाला आले होते. मात्र त्यांना महायुतीपासून वेगळं बसवण्यात आलं. परंतू काल (दि. २) संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित असल्यामुळे अजित पवार यांनी भाजपवर कुरघोडी केल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, नवाब मलिक सोबत आहेत की नाही, याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती

शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती मुंबई...

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...