राजकारणअखेर पालघर मतदारसंघ भाजपला; देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच: खासदार...

अखेर पालघर मतदारसंघ भाजपला; देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच: खासदार गावित हेच उमेदवार असल्याचे संकेत..!

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातून अखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून खासदार राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सूतोवाच केले आहे.

महायुतीत नाशिक, ठाणे, पालघर आणि मुंबईतील जागांचा तिढा कायम होता. आता या जागांचा तिढा सुटल्यासारखी परिस्थिती असून फडणवीस यांच्या सूतोवाचाने पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला असला, तरी येथून उमेदवार कोण हे मात्र अजून जाहीर झालेले नाही; मात्र खा. गावित यांना भारतीय जनता पक्षात आणून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची पूर्वीची शक्यता व्यक्त होत होती, ती आता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

खा.गावित यांच्यासह अन्य नेतेही भाजपत जाणार
खा. गावित यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्य पक्षांचे काही नेतेही भारतीय जनता पक्षात येतील. भारतीय जनता पक्षात लोकसभा निवडणूक लढविण्यास अनेक नेते इच्छुक होते, तरी प्रत्यक्षात खासदार गावित यांचा गेल्या सहा वर्षातील लोकसभा सदस्य म्हणून असलेला अनुभव आणि त्यांनी केलेली कामे तसेच या मतदारसंघात त्यांची असलेली स्वतंत्र मतपेढी विचारात घेऊन त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याचे संकेत आहेत.

गावित कमळाच्या चिन्हावर लढणार
या मतदारसंघातून आतापर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा ही झाली आहे. उद्या कामडी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुतीने खा. गावित यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली असून ते भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर खा. गावित ही आपला उमेदवारी अर्ज लवकरच दाखल करतील अशी माहिती समोर आली आहे.

भाजपने स्वतःकडे घेतला मतदारसंघ
पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या आ. राजेश पाटील यांची उमेदवारी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केले आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. यापूर्वी बहुजन विकास आघाडीने महायुतीला वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीने बहुजन विकास आघाडीला सोडावा, अशी मागणी होत होती;परंतु महायुतीच्या नेत्यांचा हा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीला सोडण्यास विरोध होता. मतदारसंघ बहुजन विकास आघाडीला सोडल्यास येथील शिवसेना-भाजप संपून जाईल, असा इशारा खा. गावित यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे अखेर महायुतीत हा मतदारसंघ भाजपने स्वतःकडे घेतला आहे.

वेगवेगळ्या व्होट बँकांचा गावितांना आधार
या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची असलेली स्वतंत्र मतपेढी, खासदार गावित यांचा असलेला संपर्क आणि त्यांच्या पाठीमागे असलेली आदिवासींची व्होट बँक याचा विचार करून आता खा. गावित यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुती अशी तिरंगी लढत होणार आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...