ब्रह्मा बिल्डर्सचा विशाल अग्रवालच्या सतरा वर्षे आठ महिने वय असलेल्या अल्पवयीन (?) मुलानं अलिशान कारनं उडवून अप्रत्यक्षपणे दोघांचा जीव घेतला.
दरम्यान, बिल्डर अग्रवालचा मुलगा पहाटे ज्या पबमधून दारच्या नशेत ताशी 200 च्या वेगाने कार चालवत घरी चालला चालला होता, त्या पबवर आज बुलडोझर जर चालवण्यात आला आणि कोरेगाव भीमा इथलं ते पब जमीनदोस्त करण्यात आलं.
पुणे!
बुलडोझर राज ला सुरूवात.
कोरेगाव पार्क येथे अवैधरीत्या निर्माण करण्यात आलेल्या पब वर ही तोडकामाची तयारी सुरू आहे.pic.twitter.com/NMrXPsN1Cb
— Pawan/पवन (@thepawanupdates) May 22, 2024
प्रश्न असा आहे, की या पबच्या बांधकामाला ज्या महापालिकेनं आणि संबंधित महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यानं परवानगी दिली, ते अधिकारी इतके दिवस झोपले होते का? एखादी गंभीर घटना घडल्यानंतर प्रशासन का जागं होतं? या प्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई होईल का, अशीदेखील विचारणा या निमित्तानं केली जात आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक…!
पुण्यातल्या कल्याण नगर परिसरात भरधाव वेगानं अलिशान कार चालवत दोघांचा जीव गेल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी संबंधित बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बापाला अटकही करण्यात आली. मात्र पोलिसांनी भादंवि 304 हेच कलम लावण्यात आलं असल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं. यापुढे असे प्रकार होणार नाहीत यासाठी महापालिकेलादेखील विशेष अधिकार देण्यात आल्याचं ते म्हणाले.
तुम्हीच पहा आता हा व्हिडिओ…!