राजकारणअक्षय कर्डिले या युवा नेत्याच्या जनता दरबाराची राहुरी मतदार संघात चर्चा..!

अक्षय कर्डिले या युवा नेत्याच्या जनता दरबाराची राहुरी मतदार संघात चर्चा..!

spot_img

अक्षय कर्डिले या युवा नेत्याच्या जनता दरबाराची राहुरी मतदार संघात चर्चा..!

राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते आमदार शिवाजी कर्डिले निवडून आल्यानंतर नुकतीच त्यांची मणक्याच्या आजारामुळे मुंबईतील  लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली .

तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची रुग्णालयात जाऊन भेट देऊन तब्येतीची काळजी घेण्याचे घेण्याचा सल्ला दिला .

दरम्यान , राहुरी विधानसभा मतदारसंघात याची चर्चा सुरू झाली .आमदार कर्डिले यांचे पुत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा नेते अक्षय कर्डिले यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघात आपला संपर्क सुरू ठेवत तो वाढविण्याचे दिसून येत आहे .

मागील आठवड्यात राहुरीतील पूजनीय अण्णासाहेब मोरे यांच्या महा सत्संग मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे अक्षय कर्डिले यांचा तालुक्यातील संपर्क चर्चेत आला होता.

नुकताच अक्षय कर्डिले यांनी आता मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी जनता दरबार घेत त्यात नागरिकांच्या गाठीभेटी व विविध प्रश्नांबाबत लक्ष देण्याबाबतच्या चर्चांना चांगल्याच जोर धरू लागल्या असून अक्षय कर्डिले यांनी यानिमित्ताने राहुरी विधानसभा मतदारसंघात जनसंपर्कमध्ये आपली पकड घट्ट करण्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा नेता अक्षय कर्डिले यांच्या जनता दरबाराची सध्या विधानसभा मतदारसंघातील राहुरी नगर पाथर्डी तालुक्यात चर्चा सुरू आहे .

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन माफिया व पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतानेच चालतो धान्याचा काळाबाजार? सखोल चौकशी करून मोक्का अंतर्गत कारवाई होईल का?

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन माफिया व पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतानेच चालतो धान्याचा काळाबाजार? अहिल्यानगर...

अहिल्यानगर जिल्हापरिषदेचा अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडला..!

यशस्वी सापळा कारवाई ▶️ युनिट - अहिल्यानगर. ▶️ तक्रारदार- पुरुष,वय-60 वर्षे ▶️ आरोपी - अशोक मनोहर शिंदे,...

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय…! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का ‘ॲक्शन’?

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय...! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का 'ॲक्शन'? महासत्ता भारत / अहिल्यानगर गोरगरिबांच्या...