६०० दिवसांसाठी फिक्स डिपाॅझिट करा आणि ७ . ८५ टक्के व्याज घ्या!

spot_img

तुमच्याकडे पैसा पडून असेल, तर डोळे बंद करुन गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. कारण पंजाब नॅशनल बँकेनं Panjab National Bank गुंतवणूकदारांसाठी एक भन्नाट योजना आणलीय. या बँकेत ६०० दिवसांसाठी पैसे ठेवल्यास त्यावर पैशांवर ७ . ८५ टक्के व्याज मिळणार आहे.

आपल्याकडे एखाद्यानं जमीन विकली, तर त्याला लाखो रुपये मिळतात. जमिनीच्या किंवा फ्लॅट किंवा प्लाॅटच्या खरेदी विक्रीत म्हणजे रियल इस्टेटमध्येदेखील Real Estate कमिशन म्हणून चांगले पैसे मिळतात. एखाद्याला लाॅटरी लागल्यानंतरही खूप जास्त पैसे मिळतात.

मात्र अचानक मिळणार्‍या लाखो रुपयांचं काय करायचं, याचं नियोजन नसल्यानं तो पैसा जसा येतो, तसा लगेच संपून जातो. मात्र अशावेळी तो पैसा जर चांगल्या विश्वासू बँकेत गुंतविला तर चांगला परतावा मिळू शकतो. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सल्ला न मिळाल्यानं आलेले लाखो रुपये कुठे खर्च झाले, हे कित्येकांच्या लक्षातही राहत नाही.

त्यासाठी पंजाब नॅशनल बँकेनं एक मोठी आणि चांगल्या गुंतवणुकीची योजना आणली आहे. 600 दिवसांच्या मॅच्युरिटीनंतर किंवा दुसर्‍या शब्दांत सांगायचं झाल्यास मुदत ठेवींवर या बँकेनं सामान्य व्यक्तींसाठी 7 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7. 50 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 7. 80 टक्के दरानं व्याज देण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, 600 दिवसांसाठी विशेष एफडी योजनेत जर एखाद्यानं पैशांची गुंतवणूक केली तर संबंधित व्यक्तीला 7 . 85 टक्के दरानं व्याज मिळणार आहे.

ही बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 3.50 ते 6.10 टक्के व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवरील व्याज दर 4 टक्के ते 6.90 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.30 ते 6.90 टक्के व्याजदर आहे.

असं म्हटलं जातं, की पैशावाल्यांकडेच पैसा जातो. हे शंभर टक्के खरं आहे. कारण ज्यांच्याकडे दरदिवशी लाखो रुपये येतात, त्यांना या सर्व पैशांची कुठं गुंतवणूक करायची, कुठल्या बँकेत जास्त परतावा मिळतो, जास्तीत जास्त व्याज दर कोणत्या बँकेत मिळतो, याविषयी या लोकांना चांगली माहिती असते.

आपल्या देशात आणि राज्यात अनेक बँका गुंतवणूकदारांना चांगला परतावा किंवा त्यांच्या गुंतवणुकीवर तगडं व्याज देतात. मात्र या बँकांचा स्टाफ ग्राहकांशी सौजन्यानं वागत नाही. काही बँकांत प्रामाणिक स्टाफ आणि सौजन्यानं वागणारा स्टाफ असला तरी त्या बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवींच्या सुरक्षेबद्दलच प्रश्नचिन्ह असते.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :