५० लाख रुपयांची फसवणूक करणारा आरोपी गजाआड!

spot_img

५० लाख रुपयांची फसवणूक करणारा आरोपी गजाआड!

 

नगर प्रतिनिधी (दि.२१ जानेवारी):-शेअर ट्रेडींगमध्ये जास्त नफा करून देण्याचे अमिष दाखवून ५०,६३,०००/फसवणूक करणारा आरोपी गुजरात राज्यातून अहमदनगर सायबर पो.स्टे.कडून जेरबंद करण्यात आला आहे.दि.०६/१०/२०२२ रोजी फिर्यादी यांनी फिर्याद दिली की,फिर्यादी यांना अदित्य पटेल फोन नं. ७२०३८७४६०७,दिनकरभाई मेहता फोन नं. ८१४०३४१५७२,गौतम सहा फोन नं.८४६९९८९३५६ व रितेश भाई फोन नं. ८३४७३३४५७२ यांनी शेअर ट्रेंडीग मध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवुन देतो असे सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून ५०,६३,०००/- ( पन्नास लाख त्रेसष्ठ हाजार रुपये) रुपयांची फसवणुक केली आहे.म्हणुन माझी ७२०३८७४६०७,८९४०३४१५७२,८४६९१८१३५६, ८३४७३३४५७२ मोबाईल नंबर धारका विरुध्द कायदेशीर फिर्यादआहे.वगैरे मचकुरचे फिर्यादी वरुन गुन्हा सायबर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८/२०२२ भादवि ४९९, ४२० सह माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६(D) रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.

 

वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाले नंतर श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.ज्ञानेश्वर भोसले यांचे नेतृत्वाखाली पोसई/प्रतिक कोळी,पोहेकॉ/ योगेश गोसावी,पोहेकॉ/उमेश खेडकर,राहुल हुसळे,पोना/ दिंगबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर,निलेश कारखेले,पोकॉ/अरूण सांगळे या सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने सदर गुन्हयामध्ये तांत्रीक विश्लेषण करून वरील गुन्हयातील आरोपी हे जिल्हा मेहसाना,गुजरात येथील असल्याने वरील नमुद पथकाने सदर ठिकाणी जावून आरोपीचा सलग तीन दिवस शोध घेतला आरोपी हे तंत्रज्ञानात कुशल असल्याने ते स्वतःची ओळख लपवत होते वेळावेळी ठिकाण बदलत होते.असे असून सुध्दा वरील पथकातील तांत्रीक तपासाचे अधारे गुन्हयातील महत्वाचा आरोपी रौनककुमार रमेशभाई परमार वय २८ धंदा नोकरी रा.मु.पो.कुवासना ता.विसनगर जि.मेहसाना राज्य गुजरात ह.रा.रुम नं ६६ लवकुश प्लस सोसायटी, सुजातपुरा रोड कीताकडी जि.मेहसाणा राज्य गुजरात यास ताब्यात घेतले त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री.ज्ञानेश्वर भोसले,सायबर पो.स्टे.हे करीत आहे.सदरची कामगिरी श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :