११ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार ; नराधमाला पोलिसांनी केली अटक
अक्कलकोट तालुका परिसरात एका 11 वर्षीय मुलाला थंड पेय पाजून 25 वर्षीय तरुणाने बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Torture) केल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी दिलीप गावडे (वय 25 रा. वागदरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली.
याप्रकरणी उत्तर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलाच्या आईने फिर्याद दिली. अक्कलकोट तालुका परिसरात बुधवारी सायंकाळी 7 वाजता मैदानाजवळ पीडित 11 वर्षांचा मुलगा लग्नाची वरात पाहण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी आरोपी दिलीप गावडे (रा. वागदरी ता. अक्कलकोट) हा पीडित मुलाकडे आला. त्याला जवळ जाऊन बोलावून घेतले. नंतर त्याने थंड पेय पाजण्यास नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
पीडित बालक हा जखमी असून, त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.