१० मे नंतर बंद होणार ‘अवकाळी’चा थिंगाणा ; हवामान खात्याचा अंदाज !

spot_img

गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसासाठी घोगावणारी ‘ वारा-खंडितता ‘ प्रणाली संपुष्टात आली आहे. आजपासुन पुढील ३ दिवसानंतर म्हणजे बुधवार दि.१० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे स्वच्छ होण्याची शक्यता जाणवते.

आगामी तीन दिवसात (७, ८ व ९ मे) मात्र महाराष्ट्रातील केवळ मुंबईसह रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर ह्या जिल्ह्यातच ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

बंगालच्या उपसागरात मंगळवार दि.९ मे ला विकसनाकडे झेपावणाऱ्या ‘ मोचा ‘ चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या वातावरणावर कोणताही परिणाम जाणवणार नाही. बद्री-केदार पर्यटकासाठी बुधवार दि. १० मे नंतर तेथील वातावरण निवळतीकडे झुकत असून पश्चिम हिमालय चढाईसाठी सध्या तरी ठिक समजायला हरकत नाही.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :